Udise टीचर पोर्टल
सर्व मुख्याध्यापक यांनी बदली झालेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून Detach करावे आणि आपल्या शाळेत नवीन जॉइन झालेल्या शिक्षकांना आपल्या udise टीचर लॉगिन वर Attach करून घ्यावे.
ज्या शाळेतून बदली झाली आहे व कार्यमुक्त केले आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून..
https://udiseplus.gov.in/udiseteacher/
वरील लिंक वर क्लिक करून मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.
वरील पेजवरील लाल रंगात गोल केलेल्या ठिकाणी क्लिक करा. पुढील प्रमाणे पेज ओपन होईल.
एकूण शिक्षक संख्येच्या आकड्यावर क्लिक करा.. सर्व शिक्षकांची यादी ओपन होईल व पुढील प्रमाणे पेज ओपन होईल..
ज्या शिक्षकांशी बदली झाली आहे त्या शिक्षकाच्या शेवटच्या रकान्यात असलेल्या Left School वर करा.
त्या अगोदर दुसऱ्या शाळेत इम्पोर्ट करण्यासाठी शिक्षकांचा नॅशनल आयडी नोंदवून घ्या. त्याची सुरुवात TP या अक्षरांनी सुरू झाली असेल.
यानंतर अगोदरच्या शाळेची लॉग आऊट करा व ज्या शाळेत बदली झाली आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. पुन्हा वरील प्रमाणे Teaching Non Teaching Staff वर जा. त्या पेजवरील शिक्षक संख्येच्या अंकावर क्लिक करा पुढील प्रमाणे पेज ओपन होईल त्यामधील इम्पोर्ट स्टाफ वर क्लिक करा.
त्यापुढे ओपन झालेल्या पेज वर तुम्हाला अगोदर नोंदवून घेतलेला टीचर नॅशनल आयडी व जन्मतारीख टाकून शिक्षक शोधता येईल.
व या शाळेतील जॉइनिंग डेट टाकून सदर शिक्षकाला शाळेत इम्पोर्ट करता येईल.
इम्पोर्ट केल्यानंतर नवीन शाळेच्या यादीत सदर शिक्षकाचे नाव दिसेल त्याची प्रोफाइल अपडेट करून घ्यावी.
यु-डायस प्लस पोर्टलवर शिक्षक आधार कसे व्हॅलिड करायचे अगोदरच व्हॅलिड असल्यास कसे पहायचे.
सहज सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरूनच यु-डायस प्लस पोर्टलवर शिक्षक आधार व्हॅलिड आहे की नाही हे तपासून व्हॅलिड नसल्यास कसे व्हॅलिड करावे हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया.
त्यासाठी आपल्या मोबाईल मधील गूगल ॲप्लिकेशन ओपन करून पुढील प्रमाणे त्यामध्ये Udise Plus Teacher Login असे शब्द गुगल सर्च बार वर टाईप करून सर्च करा तुम्हाला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
पुढील विंडोमध्ये दिलेल्या चौकटीतील लिंक वर म्हणजेच पहिल्या सर्च रिझल्ट वर क्लिक करा.
बॅक घेऊन पुन्हा पुढील प्रमाणे विंडो ओपन झाल्यानंतर सदर शिक्षकाचे आधार माहित पूर्ण अचूकरीत्या भरल्यानंतर खाली दिलेल्या विंडो मधील Verify Aadhaar From UIDAI या निळ्या बटनवर क्लिक करा जर माहिती अचूक असल्यास.
आपल्याला शिक्षकाच्या आधार माहिती रकान्यात हिरव्या अक्षरात Verified From UIDAI असे शब्द दिसून येतील व त्याखाली हिरव्या अक्षरातच व्हेरिफिकेशन डेट देखील दिसून येईल. असे दिसून आल्यास सदर शिक्षकाचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहे असे समजावे.
वरील प्रमाणे प्रत्येक शिक्षकाची आधार माहिती अपडेट करून आधार व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यावे.
धन्यवाद!
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏















0 Comments