स्टुडन्ट पोर्टल वरील आधार मिस मॅच या तारखेपर्यंत अपडेट करणेबाबत संचालकांचे आदेश.
प्राथमिक शिक्षण संचालनलयाच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार दिनांक सात फेब्रुवारी 2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनेनुसार स्टुडन्ट पोर्टल मधील विद्यार्थ्यांच्या आधार बाबतच्या कामकाजासाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करून घेण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये संदर्भीय विषयाबाबत चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान आधार नोंदणी व दुरुस्ती तातडीने करणे बाबत माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्या आहेत.
त्यानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांनी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सदर कामाकरिता कालमर्यादा निश्चित करून सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे.
संच मान्यतेसाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी असणारी विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नसेल त्यांची आधार नोंदणी करण्याबाबत तसेच ज्या विद्यार्थ्यांचा आधार नोंदणी मध्ये दुरुस्ती असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची आधार बाबतची माहिती दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. यासाठी आपले अधिनिष्ठ सर्व शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांना तातडीने सूचना देऊन त्यांच्या अधिनिस्त केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी इत्यादी त्यांच्या कामाचे नियोजन करून ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार बाबतची जी कामे अपूर्ण आहेत असे विद्यार्थी सरल प्रणाली वरून शाळे कडून उपलब्ध करून घ्यावे आणि सदर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून काम पूर्ण करून घ्यावे तसेच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी पटावर जरी असले तरी ते शाळाबाह्य झालेले असतात. यांचा देखील तपास करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना दिल्या आहेत.
Student Portal
आधार मिसमॅच दुरुस्ती..
स्टुडंट पोर्टलवर आधार दुरुस्ती सुविधा सुरू झाली आहे.
1. प्रथम लॉगिन करा.
2. आधार मिस मॅच टॅब वर जा.
3. तेथून name mismatch/ किंवा ज्यात आपले विद्यार्थी असतील त्यावर क्लिक करा.
4. विद्यार्थी यादी ओपन होईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावापुढे unfreez टॅब आलेली दिसेल.
5. त्यावर क्लिक करा. विद्यार्थ्याच्या नावासमोर update टॅब येईल.
6. Update वर क्लिक करा.
7. नवीन विंडो ओपन होईल. नवीन विंडो ओपन होताना एरर आला तर ती क्लोज करून पुन्हा update वर क्लिक करा.
8. आधार दुरुस्ती करून save करा.
(Student portal Mozilla Firefox वर व्यवस्थित सुरू आहे.)
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments