शाळा सिद्धि अपडेट - शाळा सिद्धि अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे बाह्य मूल्यांकन करणे बाबत MSCERT चे परिपत्रक

शाळा सिद्धि अपडेट - शाळा सिद्धि अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे बाह्य मूल्यांकन करणे बाबत MSCERT चे परिपत्रक.


समग्र शिक्षा अंतर्गत शाळा सिद्धि उपक्रम अंतर्गत 2020 21 या वर्षातील स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेल्या प्राथमिक स्तरावरील 10000 व माध्यमिक स्तरावरील 1881 शाळांचे बाह्य मूल्यांकन करणे प्रस्तावित आहे.

सदर शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी आपल्या स्तरावरून शाळा व निर्धारक निश्चित करावेत निश्चित केलेल्या निर्धारकांना NIEPA नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने 24 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या आयोजन करून शाळांच्या बाह्य मूल्यांकनासाठी प्रति शाळा 490 प्रमाणे आपणास पीएफएमएस प्रणाली द्वारे निधी वितरित केला जाणार आहे तरी सोबत जोडलेल्या माहितीपत्रकानुसार आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची बाह्य मूल्यांकन करून तसा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयास ईमेलवर कळविण्यात यावा असे निर्देश उपसंचालक प्रादेशिक विद्या प्रधिकरण सर्व व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांना राज्य शैक्षणिक संशोधन परिषद चे सहसंचालक माननीय रमाकांत काठमोरे यांनी दिले आहे.



वरील परिपत्रकासोबतच माहितीपत्रक देखील देण्यात आले आहे सदर माहितीपत्रकात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 278 प्राथमिक शाळा व 52 माध्यमिक शाळा अशा एकूण 330 शाळा प्रत्येक जिल्ह्यातील निवडायच्या आहेत व त्यासाठी प्रतिष्ठा 490 रुपये एवढा निधी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्थेला वर्ग करण्यात आलेला आहे.


शाळांची निश्चिती कशी करावी? 

सन 2020 21 वर्षातील स्वयं मूल्यांकन झालेल्या वर दिलेल्या सरणीतील संख्ये एवढी शाळांची निवड करावी.

प्रत्येक केंद्रातील शाळा असावी तसेच इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता पहिली ते आठवी इयत्ता पहिली ते दहावी व इयत्ता पाचवी ते दहावी अशा शाळा घेण्यात याव्यात.( इयत्ता दहावी व बारावी परीक्षा केंद्र असलेली शाळा निवडू नये.. 

https://shaalasiddhi.niepa.ac.in/shaalasiddhi/Reports/DataStatusReportForPublicNew?AcademicYearId=0

 वरील लिंक वर जाऊन आपल्या जिल्ह्यातील शाळांची एक्सेल शीट डाउनलोड करता येईल किंवा 2020-21 या वर्षातील स्वयं मूल्यमापन पूर्ण केलेल्या राज्यातील शाळांची एक्सेल शीट देखील पत्रासोबत पाठवण्यात आली आहे यातून जिल्ह्यातील शाळा निवडल्या जाऊ शकतात.


बाह्य मूल्यांकनासाठी निर्धारक कसे निवडावे? 

हो नावाच्या शाळेची बाई मुलं आपण करावयाची आहे निर्धारक हा अ शाळेतील नसावा अशा केंद्रात येते त्या केंद्रातील निर्धारक नसावा तसेच निर्धारक म्हणून काम करणाऱ्या इच्छुक असलेल्या व्यक्तीस शाळा सिद्धि उपक्रमाची माहिती असावी. ( इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या कामात व्यस्त असलेले मनुष्यबळ निवडू नये.) 

निर्धारक किती नेमावेत? 

कमीत कमी दोन व जास्तीत जास्त पाच.

शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या याचा विचार करून निर्धारक निश्चित करावेत.

निर्धारक कोण असावेत? 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिकारी विषय तज्ञ विशेषतज्ञ विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक यापैकी कोणीही ज्याला शाळा सिद्धि उपक्रमाची माहिती आहे असा.

निर्धारक व्हाट्सअप ग्रुप प्रत्येक जिल्ह्याचा असेल.

निनिर्धारक व शाळा यांची जोडणी करताना विद्यार्थी संख्या विचारात घेऊन निर्धारक निश्चिती करावी.

निर्धारक प्रशिक्षण.

प्रत्येक जिल्ह्याचा निर्धारक व्हाट्सअप ग्रुप तयार झाल्यावर झूम मीटिंग द्वारे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि निपा न्यू दिल्ली मार्फत प्रशिक्षण आयोजित केले जाईल प्रशिक्षणाची दिनांक 24 फेब्रुवारी 2023.


बाह्य मूल्यांकनाचे वेळापत्रक.. 

शाळा निश्चिती दिनांक 17 फेब्रुवारी 2023..

निर्धारक निश्चिती दिनांक 22 फेब्रुवारी 2023..

निर्धारक व्हाट्सअप ग्रुप दिनांक 23 फेब्रुवारी 2023..

निर्धारक व शाळा यांची जोडणी दिनांक 23 फेब्रुवारी 2023,

निर्धारक प्रशिक्षण ऑनलाईन दिनांक 24 फेब्रुवारी 2023,

बाई मूल्यमापन व माहिती अपलोड करणे दिनांक 27 फेब्रुवारी 2023 ते 15 मार्च 2023..

आर्थिक बाबी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत.


वरील संपूर्ण माहितीपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.