बदली झालेल्या शिक्षकांना कधी करणार कार्यमुक्त? आजचा शासन निर्णय..
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी 2017 ते 2022 या कालावधीमधील संगणकीय प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अध्यापक मूळ जिल्हा परिषद यांनी कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
ग्रामविकास विभागाने दिनांक दोन डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता एक एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक एक मे 2023 ते 31 मे 2019 या कालावधीत अशा शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करावी असे सांगितले होते.
त्याऐवजी आता विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता दिनांक एक एप्रिल 2023 ते दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे प्रशासकीय आदेश निर्गमित करावेत व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 16 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 करण्याबाबतचे कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय पुढीलप्रमाणे. .
वरील ग्रामविकास विभागाचा शासन आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments