इयत्ता 1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित शाळेत टीसी नसली तरी मिळेल प्रवेश दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी चा शासन निर्णय

इयत्ता 1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभ रीतीने प्रवेश मिळवून देण्याबाबत दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी चा शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक ६ डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभ रीतीने प्रवेश मिळवून देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यात शासकीय अनुदानित विनाअनुदानित व स्वयं अर्थशाही असे शाळांचे विभाजन केलेले आहे. इयत्ता पाचवी ते दहावी इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता पहिली ते दहावी वर्गाचा काही शासकीय व अनुदानित शाळा सुरू आहे. या शाळेत प्राथमिक वर्ग सुद्धा समाविष्ट असल्याने अशा शाळांना मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क 2009 कायदा लागू आहे. या कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी संबंधी शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 31 डिसेंबर 2023 मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

कोविड महामारीच्या कालावधीनंतर शासनाच्या असे लक्षात आले आहे काही कारणांमुळे उदाहरणार्थ आर्थिक अडचणीमुळे किंवा शुल्क न भरल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून पीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला नवीन सर्टिफिकेट देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित शाळेत सदर दाखल्याच्या अभावी प्रवेश देण्यात येत नाही यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते व त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाते आरटीई धिनियम कलम पाच मधील तीन व दोन नुसार विद्यार्थ्यास एखाद्या शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावयाचा हक्क साधारण परिस्थितीमध्ये दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मूळ शाळेतील शाळा प्रमुख तात्काळ टीसी ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट देतात तथापि काही कारणामुळे असे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत असेल किंवा सदर दाखला नाकारला जात असेल तर दुसऱ्या शाळेत शासकीय किंवा अनुदानित शाळेत प्रवेश देण्यात उशीर करणे अथवा प्रवेश नाकारणे अन्यायकारक ठरेल. माध्यमिक शाळा संहितेतील कलम 18 नुसार एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याच्या बाबतीत ही तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश देणे तसेच वयानुसार प्रवेश देण्याची बाबतीत प्रक्रिया सुरत करण्याच्या दृष्टीने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

राज्यातील कोणत्याही शासकीय महानगरपालिका नगरपालिका खाजगी अनुदानित कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयम अर्थसाहित तत्त्वावर चालविण्यात येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळात संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच टीसी अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये. आर टी इ धिनियमातील कलम चार अन्वये शालेय प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. असे नमूद आहे आणि कलम 14 एक नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतूद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश घेण्यात यावा.

राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका खाजगी अनुदानित कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयं अर्थसाहित तत्त्वावर चालवण्यात येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रमास, मंडळास संलग्न असलेल्या माध्यमिक शाळेत इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गात अन्य शाळेतील विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करत असेल अशा विद्यार्थ्यांना टीसी म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट च्या अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी पूर्वीच्या शाळेतील टीसी म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी जन्म तारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन इयत्ता दहावी पर्यंत वयानुसार प्रवेश वर्गात देण्यात यावा. प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही तसेच शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरुद्ध मुख्याध्यापकाविरुद्ध नियमानुसार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

उपरोक्त प्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टल वरील माहिती मिळवण्याची विनंती जुन्या शाळेकडे व जुनी शाळा सात दिवसाच्या विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्रप्रमुख अशी विनंती त्यांचे स्तरावरून मान्य करतील.




 वरील शासन निर्णय संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.