जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया 2022 आजचे महत्त्वाचे अपडेट ग्रामविकास विभागाचे पत्र

आज दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक सात एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासनाच्या दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलांची प्रक्रिया राबवण्यात आली आहे आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक अभ्यास गटासमवेत विशिद्वारे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्द्या संदर्भात खालील प्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहे.



1) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाबाबत:-

संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पदस्थापना सदर बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना दिनांक 10 जून 2022 च्या शासनपत्रांवर देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत फक्त दिनांक 10 जून 2022 च्या पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे.


2) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती बाबत:-

सन 2022 या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक पाच सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे शासनाकडील दिनांक 30 ऑगस्ट 2022 च्या पत्रांमुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळविले आहे तथापि कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करताना प्रचलित धोरणानुसार दहा टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाही याची दक्षता घेण्याचे ही सदर पत्रात नमूद आहे. त्यामुळे सन 2022 या वर्षात जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शासनाकडील दिनांक 8 ऑगस्ट 2022 च्या पत्रातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.


3) सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या पसंती क्रमाबाबत:-

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील टप्पा क्रमांक पाच मध्ये बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती नमूद आहे. त्यानुसार अशा शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक चार ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे. असा पसंती क्रम देताना त्यांना अवघड सर्वसाधारण क्षेत्रातील जागांचा पसंती क्रम देण्याची मुभा आहे.


4) क्षेत्र वाढीमुळे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांबाबत व बंद शाळाबाबत.


महानगरपालिका नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांसह सेवा हस्तांतरित करण्याबाबत पुणे व ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयात विविध वीट याचिका दाखल केलेल्या आहेत सदर याचिकांमध्ये ग्रामविकास विभागाकडील दिनांक 20 जुलै 2019 1999 व दिनांक 25 जुलै 2019 रोजी चे दोन्ही शासन निर्णय आजही अस्तित्वात असल्याचा तसेच त्यातील तरतुदी विसंगत परस्पर विरोधी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला असून सदर याची का माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे महानगरपालिका नगरपालिका यांचे क्षेत्र वाढीमुळे या क्षेत्रात हस्तांतरित होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या सेवेसहस्तांतरित करण्याबाबतचा मुद्दा सदर याचिकांमध्ये न्यायप्रविष्ट असून अशा प्रकरणी मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांच्या बदली बाबत करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाच्या दिनांक 12 ऑगस्ट 2022 च्या पत्रांमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व ठाणे यांना कळविण्यात आले आहे.

राज्यातील अन्न जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी अशाच प्रकारच्या याचिका माननीय न्यायालयात दाखल केल्या असल्यास त्या प्रकरणी देखील शासनाच्या मुक्त दिनांक 12 ऑगस्ट 2022 च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे जेणेकरून मान्य न्यायालयाच्या आदेशाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही.


5) समानीकरणाबाबत:-

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलांसंदर्भातील शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2019 मधील परिशिष्ट 2.3 मध्ये शाळांनी हा रिक्त जागा घोषित करण्याबाबतची तरतूद नमूद असून परिशिष्ट 4.1 टप्पा क्रमांक एक मध्ये याबाबतची कार्यपद्धती नमूद आहे. समानीकरणाबाबत सदर शासन निर्णयातील उक्त तरतुदीनुसार कार्यवाही करावी. 

6)नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरित झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांक बाबत. 

असे शिक्षक सध्या कार्यरत असलेल्या नवनिर्मित जिल्हा यापूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होतात त्या जिल्हा परिषदेतील त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक हा नवनिर्मित जिल्ह्यात सेवा हस्तांतरित झालेल्या शिक्षकांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक म्हणून नमूद करावा. 


शासनाच्या संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वय विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलांची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात शासनाची सुधारित धोरण व त्या अनुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना तसेच वरील स्पष्टीकरणात्मक सूचना विचारात घेऊन विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती ग्रामविकास विभागाचे उपसचिव माननीय का गो वळवी यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे. 







वरील ग्रामविकास विभागाचा आजचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.