शाळा विकास आराखडा 2022-23 भरण्यासंबंधी च्या सूचना - नमुना आराखडा (पीडीएफ/एक्सेल) (School Development Plan)

 शाळा विकास आराखडा 2022-23 भरण्यासंबंधी च्या सूचना - नमुना आराखडा (पीडीएफ/एक्सेल). 


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई(MPSP, Mumbai)यांचेकडून दरवर्षी सर्व शाळां कडून शाळा विकास आराखडा तयार करून घेतला जातो. या वर्षी देखील आपणास सदर शाळा विकास आराखडा तयार करून द्यावयाचा आहे. दरवर्षी हा आराखडा आपण कोरा झेरॉक्स घेऊन भरतो यामध्ये चुका होऊ नये म्हणून प्रथम पेन्सिलने भरतो व नंतर त्याला पेनाने भरतो यावर्षी आपल्याला असे करण्याची गरज नाही कारण आपण आपल्या ब्लॉगवर शाळा विकास आराखडा एक्सेल शीट च्या स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत तो आपण डिजिटली भरू शकता त्यामध्ये बदल करू शकता संपूर्ण माहिती पक्की झाल्यानंतरच त्याची प्रिंट काढून पंचायत समितीला किंवा वरिष्ठ कार्यालयाला सादर करू शकता. 


शाळा विकास आराखडा पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शहर विकास आराखडा एक्सेल शीट स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


वरील शाळा विकास आराखडा डिजिटल स्वरूपात आपण एक्सेल शीट मध्ये भरू शकतात तो भरताना पुढील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. 


विकास आराखडा भरतांना च्या मार्गदर्शक सूचना. 

@ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कलम 22 एक नुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावयाचा आहे. संबंधित केंद्रप्रमुख समन्वयक यांनी आराखड्याची मूल्यमापन करावे हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला तात्काळ सादर करावयाचा आहे. 

@ शाळा विकास आराखडा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील शाळा सुविधा, समता, गुणवत्ता आणि लोकसहभाग. 

@ शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा गट मनपा आराखडा जिल्हा राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. म्हणून शाळा विकास आराखडा या मधील आकडेवारी अचूक असावी. 

@ प्रस्ताविका च्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असावी. 

@ गाव वार्डातील शैक्षणिक बाबींचा नकाशा मध्ये बालवाडी अंगणवाडी पासून माध्यमिक स्तरापर्यंत च्या सर्व शैक्षणिक सुविधांचा समावेश नकाशात असावा सदर आराखडा सादर करणाऱ्या मूळ शाळेपासून चालत जाण्याचे अंतर माध्यम आणि व्यवस्थापन प्रकार नमूद करावी. 

@ बानाने रिशी शेजारी त्या वस्तीचे शाळेपासून चे चालत जाणा-या योग्य रस्त्याचे अंतर किलोमीटर लिहावे क्रमांक एक वर्ष शाळा ज्या वस्तीमध्ये आहे त्या वस्तीचे नाव आहे. 

@ स्थानिक प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका किंवा कटक मंडळ होय. 

@ शाळा वस्ती बाबत माहिती देताना जनगणना 2011 चा संदर्भ घ्यावा. 

@ परिवहन सुविधा:- अपवादात्मक परिस्थितीमध्ये दुर्गम भागातील आणि शहरी वंचित बालके यांसाठी ही सुविधा निकषानुसार अनुज्ञेय आहे. 

@ विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी अनुज्ञेय शैक्षणिक सुविधा:-

स्थानिक शाळेत समाज पक्ष वर्ग उपलब्ध नसल्यास किंवा निमशहरी व शहरी भागात शाळेचे अंतर अधिक असल्यास सुरक्षित व नियमितपणे शाळेत ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास भत्ता. 

• अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत समूह साधन केंद्र मध्ये टेक केअर सेंटर मध्ये शाळापूर्व कार्यक्रमांमध्ये तसेच विविध थेरपीची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेरपी केंद्रांमध्ये ये-जा करण्यासाठी प्रत्यक्ष प्रवास खर्च. 

• शस्त्रक्रिया झालेल्या व थेरपीची गरज असलेल्या मुलांना नियमित शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत समूह साधन केंद्र मध्ये डे केअर सेंटर मध्ये शाळा पूर्व कार्यक्रमांमध्ये तसेच विविध थेरपीची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेरपी केंद्र मधील प्रोत्साहनात्मक मदतनीस भत्ता. 

• मतिमंद बहुविकलांग सेरेब्रल पाल्सी व अंध प्रवर्गातील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शालेय प्रवाहात दाखल झाल्यास दैनंदिन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक अध्ययन साहित्य भत्ता. 

• शेजार शाळा निकषाप्रमाणे शाळा उपलब्ध नसल्यास व नियमित शालेय प्रवाहात दाखल झाल्यानंतर वस्तीगृहा मधील राहून शिक्षण घेत असल्यास वस्तीगृह भत्ता. 

• अंधत्वाचे प्रमाण 75 ते 100 टक्के पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना वाचक भत्ता. 

• दृष्टीदोष अध्ययन अक्षम व स्नायूंच्या दोषांमुळे गंभीर लेखन समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्‍यकतेप्रमाणे लेखनिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी लेखनिक भत्ता. 

• वैद्यकीय व पुनर्वसन केलेल्या कार्यात्मक मूल्यमापन आंसर शिफारस केलेली आवश्यक साहित्य साधने उदाहरणार्थ श्रवण यंत्र, लो विजन साहित्य, चष्मे, भिंग, अंध काठी, बेल किट, ब्रेल बुक, पाठ्यपुस्तकावर आधारित ऑडिओ सीडी, व्हील चेअर, तीन चाकी सायकल, कुबडी, रोलेटर, waker, कॅलिपर, मॉडिफाइड चेअर इत्यादी. 

• गृह मार्गदर्शनातून शाळेत येणाऱ्या बालकांसाठी डेल रेडीनेस कार्यक्रमासाठी थेरपी सेंटर मध्ये काळजी घेण्यासारखी अध्ययनासाठी मध्यवर्ती शाळेत स्कूल रेडीनेस कार्यक्रम व डे केअर सेंटर मध्ये अति तीव्र व तीव्र स्वरूपाचे अपंगत्व असणाऱ्या बालकांची वैयक्तिक काळजी घेण्यासाठी व प्रशिक्षणासाठी स्वयंसेवक काळजीवाहक सुविधा. 

• बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 32 अन्वय बालकांच्या हक्कांची संबंधित तक्रार व घर आणि स्थानिक प्राधिकरणातर्फे मांडवयाची तरतूद आहे. 

• उपरोक्त प्रमाणे अधिनियमाच्या आधीन व 21 एप्रिल 2014 च्या शासन निर्णयाप्रमाणे तालुका जिल्हा महानगरपालिका प्रभाग सज्ञा विविध स्तरांवर तक्रार निवारण समित्यांचे गठन करणे आवश्यक आहे. 

• E1 व E2 मधील मुलांचा समावेश विशेष प्रशिक्षणासाठी झाला असल्याची खातरजमा करण्यात यावी. 

@ स्वच्छतागृहाची निकष:-

• मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे. 

• 120 विद्यार्थी संख्या पर्यंत एक युनिट म्हणजेच 10शौचालय व तीन मुतारी. 

• उदाहरण एक शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 80 मुले व 40 मुली असले तरीही स्वतंत्रपणे मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी एक युनिट असावे. 

शाळेत एकशे दहा विद्यार्थ्यांपैकी 80 मुले 130 मुली असतील तरीही स्वतंत्रपणे मुलांसाठी एक लेख व मुलींसाठी दोन युनिट असावे. 


वरील प्रमाणे सूचनांचे पालन करून शाळा विकास आराखडा तयार करून ठेवावा म्हणजे आपण स मागणी झाल्यास लगेच उपलब्ध करून देता येईल. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.