आजची शिक्षण व्यवस्था समाजासाठी पूरक की घातक ?एक सारासार विचार..

आजची शिक्षण व्यवस्था समाजासाठी

 पूरक की घातक?

एक सारासार विचार..


मानवी जीवनात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मग ही शिक्षण देणारी व्यवस्था देखील अनन्यसाधारण असावी.. ती खरंच अनन्यसाधारण आहे का? 

 शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आणि सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येते की आजची शिक्षण व्यवस्था काही जुन्या शिक्षण व्यवस्थेतील रूढी आणि परंपरा खरे पहायला गेल्यास काही रूढ पद्धती यांना चिटकून बसली आहे.

काही शिक्षक फक्त पाठ्यपुस्तक पूर्ण करून त्या इयत्तेतील शिक्षण पूर्ण झाले या भ्रामक कल्पनेत आहेत.

काही विद्यार्थी परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवले म्हणजे आपले शिक्षण पूर्ण झाले या भ्रामक कल्पनेत आहेत.

काही पालक आपल्या पाल्याने जास्तीत जास्त गुण घेऊन एखाद्या चांगल्या व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला म्हणजे त्याचे शिक्षण उत्तम झाले या भ्रामक कल्पनेत आहे.

खरे शिक्षण म्हणजे काय हे समजून घेऊन त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करणे आपल्या पाल्याला उत्तम कसे मिळेल याकडे लक्ष घालने या सर्व गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे असे वाटते.

 काही ठिकाणी आधुनिकीकरणाच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी कुठलाही विचार न करता पालक व विद्यार्थी यांच्या माथी काही भ्रामक कल्पनांच्या आधारावर जाहिरात करून मारल्या जात आहे. फक्त परीक्षा केंद्रित आणि नोकरी कशी मिळेल या गोष्टींना जास्त महत्त्व देऊन आजची शिक्षण व्यवस्था वाटचाल करत आहे असे म्हणावे लागेल.

आणि हे सर्व सुरळीत करण्यासाठी एकूण शिक्षण व्यवस्था हळू हळू टप्प्याटप्प्याने का होईना त्यामध्ये सकारात्मक बदल होणे आणि शिक्षण म्हणजे काय हे नेमके समजून घेऊन त्यानुसार शिक्षण व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर निव्वळ बाजारू स्वरूप शिक्षण व्यवस्थेला आले आहे काय हा प्रश्न सुज्ञ व्यक्तीच्या डोक्यात नक्की येईल.. 

आजकाल शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटक शिक्षणाचा गाभा समजून न घेता येतात त्यातील काही गोष्टी आपल्या सोयीनुसार समजून घेऊन त्यानुसार त्यांचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आहे.

हे असे न होता शिक्षण व्यवस्थेचा मूळ हेतू काय आहे हे समजून घेऊन शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने त्यानुरूप आपली कर्तव्य जबाबदारी पूर्ण करावी जर सर्वांनाच शिक्षण म्हणजे काही समजत नसेल किंवा समजून सांगू शकत नसेल तर ज्यांना ही कळाले त्यांनी इतरांनी नेमके काय करावे हे ठरवून त्यांच्याकडून त्या पद्धतीचे वर्तन घडून आणण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी हे अपेक्षित आहे.

शिक्षण म्हणजे बालकाला काही मूलभूत गोष्टी जसे अक्षर ओळख समजपूर्वक वाचन लेखन आणि अंक ओळख व  संख्यांवरील मूलभूत क्रिया करता येण्याची कौशल्य अवगत करून देणे व त्याला पुढील जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत बेसिक गोष्टी आवश्यक आहे त्यांची ओळख करून देणे त्यानंतर मात्र त्याचा कल ओळखून एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी त्याला तयार करणे हा असावा असे आतापर्यंतचे आपले मत आहे.

जर वरील मत योग्य असेल तर आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये गुंतून पडलो आहे किंवा ही शिक्षण व्यवस्थाच कोणकोणत्या गोष्टींना ध्येय म्हणून मार्गक्रमण करत आहे जर ध्येयच योग्य नसेल तर मार्गदेखील योग्य असणे शक्य नाही त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे ही ठाम भूमिका अतिशय सोप्या भाषेत शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला हवी आणि ती नुसती पोहोचून होणार नाही तर त्यानुसार प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून त्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

शिक्षणाचे झालेले बाजारीकरण निश्चितच एक चिंतेचा विषय आहे फक्त पैसा कमवणे या उद्देशाने उभारलेली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था ह्या शिक्षण व्यवस्थेला पूरक ठरण्याऐवजी मारकच ठरक ठरत आहेत का हा विचार करून त्यानुसार सर्वसामान्य नागरिक यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. 

उदाहरण घेऊन समजून घ्यायचे झाल्यास 2006 ते 2012 पर्यंत अनेक डीएड कॉलेजेस यांना मान्यता मिळाली आणि अनेक विद्यार्थी या ना त्या मार्गाने प्रवेश मिळवून नावाचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडले. त्यापैकी अगदी मोजक्याच लोकांचा हा प्रयत्न यशस्वी होऊन त्यांचे त्यांचा उद्देश पूर्ण झाला परंतु बहुतांश लोकांच्या पदरी निराशा आली आणि आजही ते बेरोजगार म्हणून समाजात फिरत आहे. आता एवढे डीएड कॉलेजेस काढून शिक्षणव्यवस्थेला काय साध्य करायचे होते ही व्यवस्थेने ठरवले होते का हा प्रश्न उभा राहतो? जरी अनेक डीएड कॉलेजेस उभी राहिली तरी एवढ्या डीएड कॉलेजेस मधून िघणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळणे शक्य आहे काय हे तिथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेतले होते काय? याचाही विचार करणे गरजेचे आहे. हे फक्त एक उदाहरण म्हणून दिले आहे कमी अधिक फरकाने वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे देखील असेच होत आहेत का असा प्रश्न विचारल्यास त्याचा त्याचे उत्तरही होकारार्थी देण्याशिवाय इलाज नाही कारण अनेक जन वेगवेगळा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी आणि रोजगाराच्या शोधात आहेत यापैकी काही जण ज्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण करताना योग्य ती कौशल्य आत्मसात केली आहेत ते स्वयम रोजगार करून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतात परंतु ज्यांनी फक्त परीक्षेसाठी सदर व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे किंवा प्रमाणपत्रासाठी सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना नोकरी तरी कशी मिळणार? 

मग त्यांनी दोष तरी कुणाला द्यावा शिक्षण व्यवस्थेला की स्वतःला? 

या सर्व गोष्टींचा सारासार सद्सद्विवेक बुद्धीने विचार केल्यास शिक्षण व्यवस्थेची कुणालाही स्वतःहून जबाबदारी घेऊन यामध्ये बदल घडवून आणण्याची इच्छा नाही आणि जर कुणी प्रयत्नही केला तर प्रस्थापित शिक्षण सम्राट हे बदल घडवून आणण्यासाठी किती पूरक ठरतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे लागेल. मग जर हे असे असेल तर जसे चालू आहे तसेच चालू द्यायची काय की कुणीतरी पुढाकार घेऊन हळूहळू सर्वसामान्य विद्यार्थी व पालक त्यांच्यामध्ये जागृती घडवून आणली योग्य ते निर्णय घेण्यास मदत केली तर ज्या ज्या अनिष्ट गोष्टी या शिक्षण व्यवस्थित सुरू आहे त्याला आळा घालने शक्य आहे असे आमचे मत आहे.

कोणीतरी म्हटले आहेच "कौन कहता है आसमान मे नही है एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो!" ही गोष्ट फक्त आम्हालाच कळते असा आमचा दावा नसून हे सर्व शिक्षण व्यवस्थेतील सुज्ञ घटकांना कळते परंतु यासाठी ही परिस्थिती बदलण्यासाठी जे प्रयत्न होताना दिसत आहेत ते प्रयत्न कुठेतरी कमी पडत आहे हे मात्र आमचे ठाम मत आहे.

अर्थात याला फक्त शिक्षण व्यवस्था जबाबदार नसून सामाजिक परिस्थिती देखील जबाबदार आहे जर एखादा मुलगा एखाद्या चांगल्या अभ्यासक्रमासाठी दिला तर लगेच मेंढी वळणा प्रमाणे समाजातील इतर इतर पालकही आपल्या पाल्यांना त्या अभ्यासक्रमास पाठवून देण्यासाठी योग्य अयोग्य अशी सर्व प्रयत्न करतात मग पुढे दुष्टचक्र सुरू होते ते म्हणजे आजची निर्माण झालेली शिक्षण व्यवस्था जी या समाजासाठी 100% पूरक किंवा योग्य आहे असे आपण म्हणू शकत नाही.

जर आजच्या शिक्षण व्यवस्थेचा उद्देश फक्त पैसा कमावणे एवढा असेल तर या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होणारे प्रॉडक्ट म्हणजेच विद्यार्थी जो समाजाचा सुज्ञ नागरिक म्हणून बाहेर पडायला हवा तो सुज्ञ नागरिक म्हणून बाहेर न पडता त्याचा उद्देश देखील पैसा कमावणे हाच राहील यात दुमत नसावे.

चला तर मग शिक्षण व्यवस्थेतील तरच म्हणजे तो शिक्षण म्हणजे काय हे समजून घेऊ या आणि त्यानंतरच आपला पाल्य कसे शिक्षण घेईल हे ठरवूया..धन्यवाद! 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.