शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, वर्षाताई गायकवाड यांचे शाळा बंद संदर्भातील महत्वाचे ट्विट

 शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, वर्षाताई गायकवाड यांचे 

शाळा बंद संदर्भातील महत्वाचे ट्विट

महाराष्ट्रतील १ ते १२ वी पर्यंत शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष बंद करण्यात आल्या आहेत तरी विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरु राहावे यासाठी शिक्षण विभागाला योग्य ते निर्देश देण्यात आले आहे या आशयाचे ट्विट शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे..


#माझे_विद्यार्थी_माझी_जबाबदारी हे hashtag वापरून ट्विट करत शिक्षणमंत्री म्हणतात जरी आपण तात्पुरत्या स्वरूपात COVID 19 चा प्रसार थांबविण्यासाठी शाळा बंद केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे अध्ययन मात्र सुरू राहील यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळ्या आँनलाईन मध्यामांचा वापर करून आभासी स्वरूपात शाळा सुरू ठेवाव्या ज्यामुळे विद्यार्थ्यांचा learnig loss कमीत कमी होईल.
यासंदर्भात शिक्षण आयुक्त यांनी रोज आढावा घ्यावा हे देखील सूचित करण्यात आले आहे.
शिक्षण मंत्री यांनी असाही विश्वास व्यक्त केला आहे की जरी शाळा बंद झाल्या तरी शिक्षण मात्र थांबणार नाही.

त्यांचे संपूर्ण ट्विट पाहण्यासाठी येथे क्लीक करायासारख्या महत्वाच्या शैक्षणीक बातम्या वाचण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला

धन्यवाद!
Post a Comment

2 Comments

  1. आद. मंत्री महोदय आपण शाळा बंद चा निर्णय घेतला आहे. पण तो सरसकट शाळा बंद न करता ज्या भागात ओमायक्राँनचे रुग्न आहेत त्या भागात शाळा बंद आसाव्या. हा रोग काय फक्त शाळेतूनच पसरतो का ? आपण मात्र लग्न समारंभ, मेळावे , बाजार , वाढदिवस, जत्रा यांना बंदी घातली नाही. मग शाळेला का बंद केले ? जर इतर सर्व बाबतीत 50% सूट देण्यात आली असेल तर शाळेत पण 50% विद्यार्थ्यांना येवून शिकण्याची परवानगी दयावी.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.