नवोपक्रम - विद्यार्थी अभ्यास दूत (COVID 19 काळ) - शाळा बंद असल्यामुळे त्यावर शोधलेला उपाय आणि प्रयत्न

  

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१ – २०२२

 

 

 

नवोपक्रमाचे नाव

 

विद्यार्थी अभ्यास दुत

(COVID 19 काळ)

 

 

 

स्पर्धकाचे नाव

श्री प्रदिप गणपत जाधव

(सहाय्यक शिक्षक)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,

वरखेड, ता. चिखली जिल्हा. बुलडाणा.

ईमेल jadhaopg@gmail.com

वेबसाईट www.pradipjadhao.com

 


 

प्रमाणपत्र 1

 

शैक्षणीक स्पर्धेसाठी सादर करत असलेला नवोपक्रम हा मी स्वतः माझ्या शाळेत राबविलेला असून माझ्या शैक्षणीक अनुभवावर आधारित आहे. हा नवोपक्रम काल्पनिक नाही अथवा भारतीय किंवा विदेशी लेखकांच्या ग्रंथातील माहितीच्या आधारे लिहिलेला नसून यामध्ये मी मला जाणवलेल्या समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा नवोपक्रम इतर कोणत्याही व्यक्तीकडून लिहून घेऊन माझ्या नावावर सादर केलेला नाही.

 

 

 

स्पर्धकांचे नाव

प्रदिप गणपत जाधव

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड,

ता. चिखली जिल्हा. बुलडाणा.

 

 

शाळेचे मुख्याध्यापक

 

श्री शरद त्र्यंबकराव बंगाळे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड,

ता. चिखली जिल्हा. बुलडाणा.

 

 

 

 

 

 

प्रमाणपत्र II

 

प्रमाणित करण्यात येते की हा नवोपक्रम मी यापूर्वी कोणत्याही राज्यस्तरीय, राष्ट्रिय स्पर्धेसाठी किंवा परीक्षेसाठी यापूर्वी पाठवलेला नाही तसेच सदरहू नवोपक्रम संस्थेच्या किंवा शाळेच्या अन्य कोणत्याही संशोधनाशी संबंधीत नाही.

 

 

 

 

स्पर्धकांचे नाव

 

श्री प्रदिप गणपत जाधव

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड,

ता. चिखली जिल्हा. बुलडाणा.

 

 

 

शाळेचे मुख्याध्यापक

 

श्री शरद त्र्यंबकराव बंगाळे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड,

ता. चिखली जिल्हा. बुलडाणा.

 

 

नवोपक्रम

१)नवोपक्रमाचे नाव: - विद्यार्थि अभ्यास दूत

Covid परिस्थिती ही अचानक निर्माण झालेली परिस्थिती होती आणि त्यामुळे कुठलीही पूर्वतयारी करण्यास कुणालाच वेळ मिळाला नाही अशा वेळी प्राप्त परिस्थिती आणि साधने याचा विचार करून योग्य पर्याय निवडणे आणि कार्यवाही करणे महत्वाचे ठरते या परिस्थितीत विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षक प्रत्यक्ष जरी पोहचु शकत नव्हते परंतु खेडेगावातील परिस्थिती पाहता काही उपाययोजना करणे शक्य होते आणि तेच ऊपलब्ध साधनांचा योग्य आणि पुरेपूर वापर करण्याचा प्रामणिक प्रयत्न या उपक्रमात करण्यात आला आहे.

शाळा प्रत्यक्ष बंद होत्या. विद्यार्थी आणि शिक्षक प्रत्यक्ष समोरा समोर नव्हते, शाळेत जी परीस्थिती शिकवण्या साठी असते त्यापेक्षा खूप वेगळ्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणे यासाठी वेगळ्या वाटा चोखंदळन्याची ही वेळ होती.

जर आँनलाईन क्लास घ्यायचा तर सर्व विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध नव्हती. परंतू काही विद्यार्थ्याकडे ही साधने उपलब्ध होती. सर्व विद्यार्थ्यांना आँनलाईन क्लास करणे शक्य नव्हतं पण काही विद्यार्थी मात्र नियमीत क्लास करू शकत होती.

काही विद्यार्थ्यांना आँनलाईन क्लास मधील शिकवणे पाहिजे तसे समजत नव्हते मात्र काही विद्यार्थी खूप छान प्रतिसाद देत होती. या सर्वांचा विचार करुन त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न म्हणजेच  ‘विदयार्थी अभ्यास दुत’ हा उपक्रम होय.

 

२)नवोपक्रमाची गरज आणि महत्व:-

शैक्षणिक सत्र २०२०२१ व २०२१ २२ सत्राची सुरुवात ही कोविड 19 च्या सावटाखाली झाली यावेळी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळया माध्यमातून शिक्षण देण्याचे प्रयत्न आपण केले अशा वेळी विद्यार्थि प्रत्यक्ष आपल्या समोर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागले. मग ह्या अडचणी सोडवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न केले मग ऑनलाइन झूम, गूगल मिट असो किंवा व्हॉट्स ॲप वर अभ्यास पाठवणे असो असे अनेक प्रयत्न आपण केले. परंतू ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी साधन उपलब्ध नव्हते त्यांच्यापर्यंत पोहचणे ही खूप जिकरीची गोष्ट कोविड काळात होऊन बसली होती.

उपलब्ध साधनांचा विचार करता त्या त्या गावातील विद्यार्थि ज्यांच्याकडे सुविधा उपलब्ध आहे आणि सुविधा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांचा विचार केला असता प्रत्येक गावात ज्या गावात शाळेत किँवा वर्गात शिकणारे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांशी फोनवर संपर्क केला असता लक्षात आले की आपण सुविधा उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतो आणि आपल्या 100% विद्यार्थ्यांना प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न करूया आणि यातूनच तयार झाले 'विद्यार्थि अभ्यास दूत’.

प्रत्येक गावातील काही विद्यार्थि व पालकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम सुरु झाला कोविड काळात काळजी घेऊन इतर मित्रांना आपण कसे मदत करु शकतो याविषियी आगोदर विद्यार्थि व पालकांचे समुपदेशन कारण्यात आले आणि विद्यार्थि पालकांनी सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम यशस्वी देखील झाला.

 

३) नवोपक्रमाची उद्दिष्टे:-

@लॉकडाऊन काळात १००% विद्यार्थ्यांपर्यंत पोहाचने.

@ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल अथवा ऑनलाइन अभ्यास करण्यासाठी साधन उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना देखिल अभ्यास पूर्ण करण्यास मदत करणे.

@100% विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाचा 100% अभ्यासक्रम पुर्ण करण्यास मदत करणे.

@रोज दिलेला अभ्यास रोज पूर्ण करून घेणे.  

@ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था नाही अशाही विद्यार्थ्याचा अभ्यास पूर्ण करून घेणे.

@वेळोवेळी शिक्षकांनी दीलेल्या सूचना माहिती अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.

@विद्यार्थ्याला अभ्यासात मदत करणे न समजलेले समजण्यास मदत करणे

@विद्यार्थ्यानी केलेला अभ्यास शिक्षका पर्यंत पोहचवणे.

@विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी वेळेवर सोडवणे.

 

४) नवोपक्रमाचे नियोजन.

i) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण:-

COVID सुरू झाला शाळा अचानक शाला बंद झाल्या वर्गाचा आगोदरचं व्हॉट्स ॲप ग्रुप होता त्यावर अभ्यास टाकून सर्व विदयार्थी प्रतिसाद देत नव्हती. काही विद्यार्थ्यांना अभ्यास काय व कसा करायचा कळत नव्हते. काही पालकांनी सुचवल्या नुसार झूम मीटिंग सुरू केली व रोज दोन तास मीटिंग सुरू केली शिकवणे सुरु झाले परंतू त्यातही बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांना येऊ लागल्या मग एका विद्यार्थ्याच्या मोबाइल वर अनेक विदयार्थी मीटिंग करू लागले तरीही गावखेड्यात नेटवर्क ची अडचण बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाही असला तरीही वेळेवर पालक विद्यार्थ्याला देऊ शकत नाहीत. घरात एक मोबाइलवर एकापेक्षा अधिक आणि वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाइल देणे शक्य नव्हते आता या सर्व समस्यावर उपाय शोधणे गरजेचे होते. मग अनेक पर्याय पडताळण्यात आले. प्रयोग करून पाहिले आणि 'विद्यार्थी अभ्यास दुत’. हा त्यामधील एक उपक्रम यशस्वी झाला.

ii) संबंधित व्यक्ती, तज्ञांशी चर्चा:-

सर्व विद्यार्थ्यांना फोन करून त्यांच्याशी अभ्यासाविषयी चर्चा केली त्यावरून असे लक्षात आले की काही विद्यार्थी ऑनलाइन क्लास रोज करतात आणि त्यांना चांगल्या पैकी शिकवलेले कळले आहे आणि त्यांचा सांगितलेला अभ्यासही पुर्ण आहे. परंतू काही विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन क्लास जॉईन करता येते नाही त्यामुळें अभ्यास अपूर्ण आहे नेमका अभ्यास काय करायचा व कसा करायचा हे पूर्णपणे कळलेले नाही.

यावर उपाय म्हणून ज्यांना समजते, रोज ऑनलाइन क्लास जॉईन करू शकतात अशा विद्यार्थ्याचा उपयोग मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कसा करु शकतो यावर विचार सुरू झाला सहकारी शिक्षक यांचेशी चर्चा झाली संभावित ज्या विद्यार्थ्यांकडे विदयार्थी दुत म्हणुन जबाबदारी देता येऊ शकते अशा विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला त्यांना विषय समजाऊन सांगितला COVID परिस्थिती असल्यामुळे घ्यावयाची काळजी आणि खबरदारी याबाबतही समजाऊन सांगण्यात आले.


विद्यार्थी आणि पालक यांचेशी चर्चा करतांना

iii) आवश्यक साधनांचा विचार:-

जे विद्यार्थी अभ्यास दुत म्हणुन त्यांच्या मित्रांना मदत करणार होते त्यांना sanitizar मास्क त्यांचे पालकांना उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.

ज्या विद्यार्थ्यांकडे सर्व विषयाच्या स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध नव्हत्या त्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील झेरॉक्स मशीन वरून दर आठवड्याच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) प्रत्येक गावातील अभ्यास दुत/विद्यार्थ्या पर्यंत दर आठवड्याला पोहचवण्याची जबाबदारी आम्ही शिक्षकांनी घेतली.

रोज क्लासला उपस्थित राहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहे असा किवा रोज आपाल्या मित्र/मैत्रिणी सोबत क्लास जॉईन करू शकतो अशाच विदयार्थी यांचेकडे विदयार्थी दुत म्हणुन त्यांच्या मित्रांना मदत करण्याचे काम देण्यात आले.

विद्यार्थि दुत ज्या गावात राहतो आणि त्याच्या परिसरात राहत आसलेल्या विद्यार्थ्यांकडे तो पायी चालत जाऊ शकतो अशाच विद्यार्थ्याला विद्यार्थी दुत मदत करेल असे देखील नियोजन करण्यात आले.

 

iv) करावयाच्या कृतीचा क्रम:-

@ जे विद्यार्थी आँनलाईन क्लास करु शकत नाही अशा विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी काही विद्यार्थी निवडण्यात आले.

(१)प्रणव म्हळसने (करतवाडी) ४ विदयार्थी

 

२) रोशनी वाघ व कांचन शिंदे (घानमोड) ४ विद्यार्थि

 

३) गायत्री भगत (वरखेड) ५ विदयार्थी

 

४) तनुजा कणखर (वरखेड) ५ विदयार्थी

 

५) चेतन कांबळे (वरखेड) ३ विदयार्थी

 

६) प्रेम साळवे (वरखेड) ३ विदयार्थी

 

७) सिद्धी अंभोरे (मंगरूळ न) ३ विद्यार्थिनी

 

८) पायल नावकर (मंगरूळ न) ३ विद्यार्थीनी

 

९) चैतन्य वाकडे (मंगरूळ न) ५ विदयार्थी

 

१०) विठ्ठल आदबाने (अमडापुर) ३ विद्यार्थि

 

११) सुरक्षा इंगळे (अमडापुर) ४ विद्यार्थीनी)

 

@ सुरवातीला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क करुन त्यांचेकडे कोणता विदयार्थी दुत येईल त्याला सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या

@ विद्यार्थ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना आँनलाईन क्लास कसा करायचा हे प्रत्यक्ष भेटून समजाऊन सांगण्यात आले.

@ ऑनलाईन सांगितलेला अभ्यास जे विद्यार्थी आँनलाईन क्लास करु शकत नाही अशा किमान दोन व जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्या पर्यंत पोहचवीले.

@शक्य असल्याचे एका मोबाईल वर दोन अथवा तीन विदयार्थी आँनलाईन क्लास करतील असे नियोजन करण्यात आले.

@ शिक्षकांनी आँनलाईन क्लास मध्ये शिकवले ते ठरवून दिलेल्या ज्यांनी आँनलाईन क्लास केला नाही अशा विद्यार्थ्यांना समजाऊन सांगीतले व त्यांना सांगितलेला अभ्यास करण्यात मदत केली.

@ इतर विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास अभ्यास दुत याने आपल्या मोबाईल वरुन शिक्षकांना पाठवीले.

@शिक्षकांनी अभ्यास तपासल्यानंतर शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना/दुरूस्त्या त्या विद्यार्थ्याला समजाऊन सांगीतल्या.

@ आँनलाईन क्लास हा सर्व विद्यार्थ्यांना खुला होता. ऑनलाईन क्लास मध्ये फक्त सर्वांना सारखे शिकवणे झाले की मग फक्त जे विदयार्थी शिक्षण दुत म्हणुन काम पाहत आहेत त्याचे साठी वेगळ्या वेळी त्यांच्या शंकानिरसन व ते ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे त्यांच्याबाबत असलेल्या शंका निरसनासाठी वेगळी आँनलाईन मीटिंग घेतली.

@ विदयार्थी  - विदयार्थी आंतरक्रिया याचा पुरेपूर वापर विदयार्थी अभ्यास दुत च्या माध्यमातून करून घेण्यात आला.

@ सर्व करत असताना जर काही अडचण आली तर शिक्षकांशी संपर्क करून अडचण शिक्षकांना कळवून सोडवून घेतल्या.

@ नियमीत शिकवलेल्या घटकावर घटक चाचण्या त्यांच्या घरी जाऊन घेतल्या. व उपचारात्मक अध्यापनासाठी अभ्यास दुत यांची मदत घेतली.

@ शिक्षकांनी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष भेटी दरम्यान अभ्यास दुत व ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण आहे त्यांना भेटून त्यांचे शंकानिरसन कराण्यात आले.

@ इतर दिवशी जर शिक्षण दुत यांना वाटले तर तो त्याच्याकडे दिलेल्या विद्यार्थ्याला आँनलाईन क्लास ला शंका निरसन करून घेण्यासाठी उपस्थित ठेवत होता. आणि त्या विद्यार्थ्याची इच्छा असेल तर रोजही त्याला आँनलाईन क्लास ला त्याचे सोबत बसू देत होता.

@ आँनलाईन व ऑफलाईन असा दोन्ही गोष्टीचा सुवर्णमध्य साधून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे काम अभ्यास दुत यांचे मदतीने पद्धतशीरपणे करण्यात आले.


ऑनलाईन क्लास कसा करायचा हे विद्यार्थ्यांच्या समजावून सांगताना

 


विद्यार्थी त्यांचे घरी घटक चाचण्या सोडवताना

 

 

 

V) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

हा उपक्रम सुरु केल्या नंतर जे विद्यार्थि lockdown मध्ये संपर्कात नव्हते त्या विद्यार्थ्यांचा संपर्क नियमीत व्हायला सुरुवात झाली.

ते नियमीत अभ्यास करत आहे की नाही हे रोज शिक्षकांना माहीत होऊ लागले.

वेगवेगळ्या गावातील विदयार्थी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत एका शिक्षकाला पोहचणे किंवा फोन करणेही शक्य नव्हते. फोन करून देखील फोन पालकांजवळ असल्यामुळे पालक कामात असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांशी शिक्षक सम्पर्क करू शकले नाहीत मात्र विदयार्थी दुत त्यांच्यापर्यंत अभ्यास, शाळा, शिक्षण घेऊन नियमीत पोहचू लागले.

विद्यार्थी नियमीत प्रवाहात राहू लागली. व अभ्यासक्रम पूर्ण करण्यात विद्यार्थ्यांचीही मदत शिक्षकांना मदत होऊ लागली.

जवळपास सर्व विद्यार्थी शिक्षकांशी covid परिस्थितीतही विदयार्थी दुत यांचे माध्यमातुन जोडल्या गेली.

दिवसेंदिवस आँनलाईन क्लास मध्ये मुलांची संख्या वाढू लागली.

अभ्यास पूर्ण करून पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली.

विद्यार्थ्यांना एकमेकांच्या मदतीने अभ्यास करण्यास मजा येऊ लागली.

विद्यार्थी विदयार्थी आंतरक्रिया उत्तम रित्या घडून येऊ लागली.

शिक्षकांचा निरोप विद्यार्थ्यां पर्यंत वेळेवर पोहचु लागला.

विद्यार्थ्याची अडचण शिक्षकांपर्यंत वेळेवर पोहचु लागली.

विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास शिक्षकांपर्यंत वेळेवर पोहचला. व त्यातील दुरुस्त्या सूचनाही मुलांना मिळू लागल्या.

vi)कार्यवाहीचे टप्पे:-

१)     रोज संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन क्लास या क्लास मध्ये ज्यांच्याकडे सुविधा आहे त्यांनी आपल्या मित्रांना देखील बसु देणे सोबत सोबत अभ्यास करणे आँनलाईन क्लास मधील शिकविलेले स्वतः व्यवस्थित समजून घेणे.

२)     जे विद्यार्थी आँनलाईन क्लास करु शकत नव्हते त्यांना अभ्यासदुत यांनी क्लास झाल्यानंतर काय अभ्यास झाला तो सांगणे गरज पडल्यास समजाऊन सांगणे. २ अथवा तीन विदयार्थी एकत्र करून.

३)     अभ्यास दुत यांनी सर्वप्रथम त्यांचा अभ्यास पूर्ण करणे व नंतर ज्यांचेकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास आपल्या मोबाईल वरुन पाठवणे.

४)    


शिक्षकांनी अभ्यास तपासल्यानंतर केलेल्या सूचना दुरुस्त्या वियार्थ्यांपर्यंत पोहचवणे दुसऱ्या दिवशी अभ्यास दुतासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या क्लास आगोदर आसलेल्या क्लास ला जॉईन होऊन काय केले ते सांगणे अडचनी/शंका/समस्स्या असल्यास शिक्षकांना सांगणे आणि सोडवून घेणे.

(परत १ पासुन ४ पर्यंत क्रिया)

 

 

Vii) उपक्रमासाठी इतरांची मदत

      अभ्यास दुत म्हणुन मदत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांची या उपक्रमात खूप मदत झाली. त्यांनी परिस्थिती समजून घेऊन सर्व काळजी घेऊन विद्यार्थ्यांना मास्क व इतर गोष्टी कोरोणा पासून वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या.

सहकारी शिक्षक यांनी देखील या उपक्रमात वेगवेगळ्या टप्प्यावर मदत केली गावात गेल्यानंर नियमीत आढावा घेण्यात महत्वाचं काम केले.

जे विद्यार्थी अभ्यास दुट म्हणुन काम करत होते त्यांनी या उपक्रमात सर्वात महत्वाचा वाटा उचलला आणि त्यांच्या उत्स्पूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.

त्यांची नावे

१)प्रणव म्हळसने (करतवाडी) ४ विदयार्थी

२) रोशनी वाघ व कांचन शिंदे (घानमोड) ४ विद्यार्थि

३) गायत्री भगत (वरखेड) ५ विदयार्थी

४) तनुजा कणखर (वरखेड) ५ विदयार्थी

५) चेतन कांबळे (वरखेड) ३ विदयार्थी

६) प्रेम साळवे (वरखेड) ३ विदयार्थी

७) सिद्धी अंभोरे (मंगरूळ न) ३ विद्यार्थिनी

८) पायल नावकर (मंगरूळ न) ३ विद्यार्थीनी

९) चैतन्य वाकडे (मंगरूळ न) ५ विदयार्थी

१०) विठ्ठल आदबाने (अमडापुर) ३ विद्यार्थि

११) सुरक्षा इंगळे (अमडापुर) ४ विद्यार्थीनी

हे या उपक्रमाचे सगळे महत्वाचे शिलेदार होते. यांच्या मदतीशिवाय उपक्रम पूर्व होऊ शकला नसता.

 

 

 

 

 

 

 

viii) उपक्रमाचे पुरावे
मर्यादा असल्यामुळे एव्हढेच👆

नवोपक्रमाची कार्यपद्धती

I)                  पूर्वस्थितीचे निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

Covid परिस्थिती ही अचानक निर्माण झालेली परिस्थिती होती आणि त्यामुळे कुठलीही पूर्वतयारी करण्यास कुणालाच वेळ मिळाला नाही अशा वेळी प्राप्त परिस्थिती आणि साधने याचा विचार करून योग्य पर्याय निवडणे आणि कार्यवाही करणे महत्वाचे ठरते या परिस्थितीत विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षक प्रत्यक्ष जरी पोहचु शकत नव्हते परंतु खेडेगावातील परिस्थिती पाहता काही उपाययोजना करणे शक्य होते

शाळा प्रत्यक्ष बंद होत्या. विद्यार्थी आणि शिक्षक प्रत्यक्ष समोरा समोर नव्हते, शाळेत जी परीस्थिती शिकवण्या साठी असते त्यापेक्षा खूप वेगळ्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणे यासाठी वेगळ्या वाटा चोखंदळन्याची ही वेळ होती.

जर आँनलाईन क्लास घ्यायचा तर सर्व विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध नव्हती. परंतू काही विद्यार्थ्याकडे ही साधने उपलब्ध होती. सर्व विद्यार्थ्यांना आँनलाईन क्लास करणे शक्य नव्हतं पण काही विद्यार्थी मात्र नियमीत क्लास करू शकत होती.

काही विद्यार्थ्यांना आँनलाईन क्लास मधील शिकवणे पाहिजे तसे समजत नव्हते मात्र काही विद्यार्थी खूप छान प्रतिसाद देत होती.

या सर्वांचा विचार करुन त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न म्हणजेच  'विदयार्थी अभ्यास दुत’ हा उपक्रम होय.

 

II)                कार्यवाही दरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन.

वर्गातील चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी कोण हे माहीत होते त्यांच्या पालकांना मोबाइल वर सम्पर्क केला असता ज्यांच्याकडे मोबाईल (स्मार्ट फोन) उपलब्ध आहे व ते क्लास करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतील त्यांची यादी तयार करण्यात आली. वेगवेगळया खेड्यातील विदयार्थी असल्यामुळे त्याचं गावातील विद्यार्थ्यांसाठी त्याचं गावातील मदत  'विदयार्थी अभ्यास दुत’ याचे नियोजन करण्यात आले.

खूप जास्त विद्यार्थी एका विद्यार्थ्याकडे देणेही या परिस्थितीत देणे योग्य नव्हते त्यामुळे जास्तीत जास्त ५ विद्यार्थ्यांना एक असे प्रमाण गृहीत धरले.

शक्य असल्यास शिक्षक प्रत्यक्ष भेट आठवड्यातून एकदा घेण्यात आली. म्हणजे जास्त व्यक्तींचा सम्पर्क एकाच दिवशी येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली.

 

III)               उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व नोंदी

जास्तीत जास्त विद्यार्थी आँनलाईन क्लास करु लागले.

जे क्लास करु शकत नाही त्यांचे पर्यंत देखील रोजचा अभ्यास पोहचु लागला.

त्यांचा अभ्यास शिक्षकांपर्यंत वेळेवर पोहचु लागला.

सर्वांचे शंका निरसन एकमेकांच्या मदतीने वेळेवर होऊ लागले.

आपलाच वर्गमित्र विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचून त्यांना त्यांचा अभ्यास समजावून सांगू लागला.

Covid काळातही वर्ग ६ वी चा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.

ज्यांना शक्य आहे त्यांनी आँनलाईन टेस्ट सोडवल्या ज्यांना शक्य नाही त्यांनी त्यांच्या वहीत विद्यार्थी अभ्यास दुत यांच्या मदतीने चाचाण्या सोडवल्या.

खेड्यातील विद्यार्थ्यांना देखील covid काळात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

IV)              कार्यवाहीत आलेल्या अडचणी.

आँनलाईन क्लाससाठी मोबाईल असून देखिल नेटवर्क ची अडचण कधी कधी अधिक प्रमाणत जाणवली त्यामुळें एकच घटक परत परत घ्यावा लागला.

जे विद्यार्थी ज्या गावात राहतो त्या गावातून दुसऱ्या गावाला मामाच्या गावी किंवा इतर गावी गेल्यावर यांच्याशी स्वतः शिक्षकाला सम्पर्क करावा लागला यामुळे रोज संपर्क करणे अवघड झाले.

जास्त वेळा शिक्षकांनी सम्पर्क केल्यामुळे काही पालकही फोन उचलणे टाळू लागले. ज्या गावातून एकच विद्यार्थी आमच्या शाळेत आहे त्याला मदतीसाठी अभ्यास दुत नेमणे शक्य झाले नाही. शिक्षकाला प्रत्यक्ष रोज जाणे या परिस्थितीत शक्य नव्हते.

काही मोजक्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाला कंटाळा करु लागले पुन्हा शिक्षक जाऊन त्यांना कार्यप्रवण करावे लागेल.

 

V)                माहिती विश्लेषण

सदर उपक्रम हा नियमीत पाठपुरावा व योग्य नियोजन सतत संपर्क योग्य विद्यार्थ्यांची निवड यामुळे खूप यशस्वी झाला. विद्यार्थ्यांना देखील वेगळया परिस्थितीत आपण कशी समस्या सोडवू शकतो याचे प्रात्यक्षिक अनुभवता आले.

मोबाईल वापर, मोबाईल मधील वेगवेगळे ॲप कसे हाताळावे स्वतः मोबाईल चा वापर करुन आपल्याला आलेल्या अभ्यासातील अडचणींनी कशा सोडवाव्यात याची माहिती झाली. एकमेकांना मदत करून अभ्यास कसा करावा हे अनुभवातून विद्यार्थी शिकले.

काही विद्यार्थी मोबाईल चा वापर अतीशय योग्य आणि सराईतपणे करु लागले.

 

 

 

नवोपक्रमाची यशस्वीता उद्दिष्टानुसार

१)     १००% विद्यार्थ्यां पर्यंत पोहचणे शक्य झाले.

२)     ज्या विद्यार्थ्याकडे आँनलाईन क्लास साठीचे साधने उपलब्ध नव्हती त्यांना देखील रोज अभ्यास मिळू शकाल.

३)     १००% विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत करु शकलो.

४)     रोज दिलेला अभ्यास रोज पूर्ण करून घेणे शक्य झाले.

५)     विद्यार्थ्यांना न समजलेल्या गोष्टी विद्यार्थ्यां च्या सहाय्याने समजावून सांगणे शक्य झाले.

६)     शिक्षकांनी दिलेल्या सूचना वेळेवर सर्व विद्यार्थ्यांना मिळू शकल्या.

७)     विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी अभ्यासात आलेल्या अडचणी वेळेवर विद्यार्थ्यांच्या मदतीने सोडवू शकलो.

 

समारोप

 

वेगळ्या परिस्थितीत वेगळ्या वाटा निवडणे हे अपरिहार्य होऊन जाते जर परिस्थितीचा बाऊ करुन बसलो तर जिवन पुढे जाणे अशक्य होऊन जाते. मग प्राप्त परिस्थिती मध्ये ऊपलब्ध साधनांचा योग्य वापर करून जास्तीत जास्त उत्तमात उत्तम जे आहे ते निवडून चांगले काम आपण करु शकतो हे आपण अनेक महान व्यक्तींच्या जीवनचरित्र वाचून शिकतो आणि जर ते आपल्या जीवनातही अंगीकारले तर खूप छान अनुभव आपल्याला आपल्या जीवनात देखील येतात हे या आगोदर यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यां सोबत आला आणि COVID 19 च्या परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात खेड्यातील एका शाळेत एका वर्गात 20 पेक्षा अधिक खेडेगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेला अनुभव देखील अधिक समृद्ध करून गेला.

 

 

संदर्भसूची व परिशिष्टे

मी स्वतः यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी भागात विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी म्हणुन काही विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहे त्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी काही विद्यार्थी नेमून दिलेले होते आणि याचा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात दिसून आला होता त्याला संदर्भ मानून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न covid काळात केला आहे.

 

 

ऋणनिर्देश

 

श्री. संजय बावस्कर सर सहकारी शिक्षक तसेच

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड येथील सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थी/पालक वर्ग ६ वा.

 

श्री शरद त्र्यंबकराव बंगाळे

मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरखेड

 

श्री. पी. टी. सोळंकी

केंद्रप्रमुख, मंगरूळ नवघरे केंद्र

 

श्री रामकृष्ण शिंदे

गटशिक्षणाधिकारी, प स चिखली

 

 

 

Post a Comment

6 Comments

  1. Great project sir 👌👌💐💐

    ReplyDelete
  2. Khupch chan उपक्रम sir

    ReplyDelete
  3. खूप सुंदर नवोपक्रम आहे सर ऑनलाईन माध्यमातून सर्व शक्य नाही आपल्या नवोपक्रमाचा सर्वांनाच फायदा होईल.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.