सातवा वेतन आयोग हप्ता अपडेट - राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत आजचा शासन निर्णय

 सातवा वेतन आयोग हप्ता अपडेट -

 राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत आजचा शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 24 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

शासन अधिसूचना वित्त विभाग, दिनांक ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ च्या वेतन आयोगाची थकबाकी सन २०१९-२० पासून पुढील ५ वर्षा ५ समान हप्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्याच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक ३० मे २०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक २४ जानेवारी, २०५९ आणि दिनांक १ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

राज्यात कोहि १९ (कोरोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती य त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक ०९ मे २०२२ अनाये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक १ जुलै २०१५ रोजी देय असलेल्या या वेतन आयोगाच्या बाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान दिनांक ०९ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हत्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. वरील पार्श्वभूमीवर बकबाकीच्या उर्वरीत इत्यांच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.


शासन निर्णय-


शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै २०२२ रोजी देय असलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ च्या हप्त्यांची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी:- (अ) निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या चकवाकीच्या ४ च्या हप्त्याची रक्कम माहे जून,


२०२३ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. (a) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२३ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.


(क) सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचान्यांच्या थकबाकीच्या ४थ्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२३ च्या च्या चेतनासोबत अदा करण्यात यावी.

वरील (4) आणि (क) मधील कर्मचायांच्या बाबतीत


() भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचान्याच्या थकबाकीची रक्कम त्याच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचान्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. (ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक १ जून २०२२ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचान्याना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरीत हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. २. कर्मचान्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या या यांच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ जुलै २०२२ पासून व्याज अनुज्ञेय राहील. 3. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतूदी प्रमाणे काढता येणार नाही..


५. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक १ ते ५ येथील शासन आदेशातील अन्य तरतूदीचे अनुपालन करण्यात यावे. सदर शासन निर्णय वित्त विभाग / सेवा ४ कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३४-३/२३/सेवा-४, दिनांक १८.०४.२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०५२४१३२७५३७३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे...


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने  सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्या येण्यासाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.