बदली अपडेट - जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात प्राप्त तक्रारींवर व निवेदनांवर मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार सुनावणी.

 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या दिनांक 12 मे 2023 रोजी च्या बदली संदर्भाने न्यायालयीन याची का दाखल केलेल्या शिक्षकांना तसेच शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 5.10.1 नुसार बदली संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर तक्रार दाखल केलेल्या शिक्षकांना मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी सकाळी दहा वाजता सुनावणी करता उपस्थित राहण्याचे निर्देश पुढील प्रमाणे दिले आहेत.


शासन निर्णयाचे सुधारीत धोरणातील तरतुदीनुसार सन २०२२ या वर्षातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हयांतर्गत बदली प्रक्रिया Online बदली पोर्टल द्वारे पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यानुसार शासना मार्फत संवर्ग निहाय बदली करण्यात आलेल्या शिक्षकांची यादी तसेच संगणकिय प्रणालीव्दारे शिक्षकांनी नमुद केलेल्या शाळेच्या पसंतीक्रमाप्रमाणे ऑनलाईन बदली आदेश प्राप्त झालेले आहेत.


सदर यादीतील बदली मिळालेल्या ज्या शिक्षकांनी बदली संदर्भाने मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलल्या आहेत व सदर याचिकेमध्ये मा. उच्च न्यान्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार संबंधित याचिकाकर्ते शिक्षकांना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे त्यांचे बदली संदर्भाने तक्रारी / निवेदन सादर करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद स्तरावर तक्रारी / निवदने दाखल केलेली आहेत. तसेच संदर्भ क्र. १ चे दिनांक ०७/०४/२०२१ चे शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक ५.१०.१ मधील तरतुदीनुसार बदली संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर तक्रारी / निवेदने दाखल केलेली आहेत. (तक्रार / निवेदने दाखल केलेल्या शिक्षकांची यादी सोबत जोडण्यात येत आहे.)


सदर जि.प. स्तरावर बदली संदर्भात दाखल तक्रारीचे निराकरण करण्याकरीता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक जिपब 482/ प्र.क्र.291 / आस्था. 14, दिनांक 07/04/2021 मधील मुद्दा क्रमांक 5.10.1 नुसार संगणकीय प्रणालीव्दारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीचे अनियमिततेबाबत / जिल्हांतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारीची चौकशी करुन निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत समिती समक्ष मंगळवार दिनांक 16.05.2023 रोजी स. 10.00 वा सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.


तरी सोबत जोडण्यात येत असलेल्या यादीतील तक्रारकर्ते शिक्षकांना मंगळवार दिनांक 16.05.2023 रोजी स. 10.00 वा जिल्हा परिषद, नागपूर कार्यालयात न चुकता उपस्थित रहण्याबाबतच्या सुचना आपले स्तरावरुन निर्गमित करण्यात याव्या. तसे संबंधितास कळविल्याबाबतची पोच या कार्यालास तात्काळ सादर करावी.


तसेच संबंधित शिक्षक उक्त दिनांकास विहीत वेळेत सुनावणी करीता उपस्थित न राहील्यास संबंधितांचे तक्रारी संबंधाने समिती एकतर्फी निर्णय घेण्यास सक्षम असेल व नंतर संबंधीतांचा कोणताही उजर ऐकून घेतल्या जाणार नाही यांची संबंधितास जाणीव करुन देण्यात यावी. यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

वरील प्रमाणे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना दिले आहेत.



वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.