जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना - शासन आदेश

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 15 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे.


शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ नुसार सरळसेवेची रिक्त पदे भरणेबाबत वेळापत्रक निश्चित करणेत आलेले होते. तसेच सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दि. २१ नोव्हेंबर २०२२ अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट ब (अराजपत्रित) गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पसौनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविणेच्या सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत. त्यामुळे सरळसेवेची रिक्त पदे वरील कंपनीमार्फत भरणेसाठी जिल्हा परिषदांमध्ये एकसूत्रता असणे आवश्यक आहे.


अ. जिल्हा परिषदांनी भरती प्रक्रिया राबविताना सुलभ संदर्भासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्यात.


१. भरती प्रक्रियेसाठी विचारात घ्यावयाचे वय व शैक्षणिक अर्हता आणि वय विचारात घ्यावयाचा दिनांक महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक इत्यादीद्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता नमूद केलेली आहे..


त्याचबरोबर सद्यस्थितीत असलेली वयोमर्यादा दिनांक ०३ मार्च २०२३ चे शासन निर्णयानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे) विचारात घेणेत यावी.


तसेच विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विहित कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील. (संदर्भासाठी सोबत परिशिष्ठ- "अ" जोडणेत आले आहे.) त्याचबरोबर ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ नुसार मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेले / मरलेले आहेत. अशा उमेदवारांचे व्याधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन त्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सन २०२३ मध्ये प्रसिध्द होणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातमध्ये त्यांना वयोमर्यादेत सूट


देण्याबाबतची दक्षता घ्यावी. तसेच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांचे वय निश्चित करण्यासाठी दि. ०१ जून २०२३ हा दिनांक निश्चित करणेत येत आहे.


२. वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करावयाची नमुना जाहिरात व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावयाची सविस्तर सूचना सोबत नमूना परिशिष्ठ "ब" व 'जोडणेत आलेले आहे.


३. ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी - उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दि. ०४ मे २०२२ मधील मुद्दा क. १० नुसार निवडसूचीत समाविष्ट करणेसाठी विचारात घ्यावयाच्या उमेदवारांची संख्या नमूद केलेली •आहे, त्यानुसार कार्यवाही करणेची दक्षता घ्यावी.

भरती प्रक्रियेच्या ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादी व निवड यादी कंपनीच्या सर्व्हर वरून विहित कालावधीत व विहित मार्गाने प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची राहील. 

४. उमेदवारांची कागदपत्र पडताळणी- कंपनी कडून प्राप्त झालेल्या निवड यादीमधील उमेदवारांची जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेणेसाठीचे नमूना परिशिष्ठ- "ड" सोबत जोडणेत आलेले आहे.


तसेच जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना ती ज्या कार्यालयाकडून निर्गमित करणेत आलेली आहे अथवा ती पडताळणी करण्यासाठी ज्या कार्यालयाला अधिकृत करणेत आले आहे, अशा कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवून दोन महिन्यांच्या आत पडताळणी करून घेणेची दक्षता जिल्हा परिषदांनी घेणेत यावी.

 ५. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे भरणेबाबत सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. ०१ फेब्रुवारी २०२३. शासन शुद्धीपत्रक दि.


२८ फेब्रुवारी २०२३ व शासन निर्णय दि. १० मे २०२३ नुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे निश्चित करून ती भरण्याची दक्षता घ्यावी. तसेच अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचितीतील जमातीतील उमेदवारांमधून भरताना स्थानिक अनुसूचित क्षेत्रात काम करणारे बिगर अनुसूचित जमातीचे कर्मचारी अथवा बिगर अनुसूचित क्षेत्रात काम करणारे अनुसूचित जमातीचे उमेवारांचे समायोजनाची प्रक्रिया ही नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी पार पाडण्याची दक्षता जिल्हा परिषदांनी घ्यावी.


६. निवड झालेल्या उमेदवारांना द्यावयाचा नियुक्ती आदेश -

नियुक्ती आदेश देताना त्या त्या संवर्गासाठी आवश्यक असलेल्या अर्हतेच्या बाबतीतील अटी व शर्ती, सुधारित शासन आदेश विचारात घेऊन निर्गमित करावेत. तसेच नियुक्ती आदेश हे जिल्हा परिषदांनी आवश्यकतेनुसार २D Barcode वापरून निर्गमित करावेत.


ब. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेताना परीक्षेच्या प्रत्येक सत्रातील विद्यार्थी हे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार अर्ज केल्याप्रमाणे यादृच्छिक (Random) पद्धतीने उमेदवार परीक्षा कक्षामध्ये बसतील, अशा रितीने परीक्षेचे नियोजन करण्याची दक्षता घ्यावी.


क. संदर्भाधिन शासन परिपत्रक दि. ०५ ऑक्टोबर २०२१ अन्वये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (आर) नुसार लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींना स्पर्धा परीक्षेस बसताना लेखनिक उपलब्ध करून देणेबाबतच्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्याप्रमाणे लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविणे आणि / अथवा अनुग्रह कालावधी देणेसाठीची कार्यवाही स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांना लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविणे आणि / अथवा अनुग्रह कालावधी देणेबाबतची कार्यवाही करावी. तसेच जिल्हा परिषदांना लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविणेची उमेदवाराने मागणी केल्यास जिल्हा परिषदांनी प्रचलित दरानुसार लेखनिक पुरविणेत यावा. त्यासाठीचा येणारा खर्च परीक्षा शुल्कातून करावा किंवा त्यासाठी जिल्हा परिषदेतील स्व निधीतून तरतूद करावी. उमेदवाराने परीक्षेपुर्वी लेखनिकाची मागणी न केल्यास ऐनवेळी लेखनिक पुरविता येणार नाही.


ड. जिल्हा निवड समिती मार्फत राबविणेत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेवर देखरेख व तपासणी करण्याचे अधिकार विभागीय आयुक्त यांचे राहतील.


ई. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षतापूर्वक परीक्षा प्रक्रिया पार पाडल्याचा अहवाल विभागीय आयुक्त यांना पाठवावा.


फ. उपरोक्त निर्गमित केलेल्या सूचनेनुसार मुद्दा क्र. २, ४, ६ यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास ते बदल करण्याची मुभा जिल्हा परिषदांनी राहील.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२३०५१२१६५४५५२०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.





वरील संपूर्ण शासन निर्णय परिशिष्टासह एकूण शंभर पृष्ठ असलेला पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.