बदली अपडेट - एका शाळेवर तीन वर्ष पूर्ण झालेले नसेल तरीही बदलीसाठी संवर्ग एक ला नकार देता येतो.

 🇧 🇷 🇪 🇦 🇰 🇮 🇳 🇬 

🅘︎🅝︎🅣︎🅡︎🅐︎ 🅣︎🅡︎🅐︎🅝︎🅢︎🅕︎🅔︎🅡︎

आजपासून अवघड क्षेत्रातील रिक्त भरणेसाठी संवर्ग १ मधील शिक्षकांना होकार अथवा नकार देणेसाठी पोर्टल सुरु झाले आहे.


सर्व जिल्ह्यांमधील सुगम क्षेत्रात दहा वर्ष सलग सेवा केलेल्या शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे.

सदर यादीत ज्यांची नावे आहेत अशा सर्व शिक्षक बंधू भगिनी आपणास कळविण्यात येते आहे की ज्या शिक्षकांचे एका शाळेत तीन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला होता व त्यांना मागे बदलीसाठी होकार किंवा नकार देता येत नव्हता त्यांना सुद्धा यावेळेस बदलीसाठी होकार किंवा नकार देता येते.



होकार नकार देण्यासाठी खाली लिंक वर टच करून लॉगिन करा व आपण जर संवर्धन एक मध्ये मोडत असाल व आपल्याला अवघड क्षेत्रात जायचे नसेल तर नकार नोंदवा.


पोर्टलवर नकार देताना विचारलेला प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेला असल्यामुळे आपल्याला "बदलीतून सूट हवी आहे काय? " अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असल्यामुळे जर आपल्याला बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली करायची नसेल अवघड क्षेत्रात जायचे नसेल तर सदर प्रश्नाचे उत्तर आपल्याला हो Yes असे नोंदवावे लागेल.

म्हणजे बदलीला नकार देण्यासाठी एस हा पर्याय निवडावा लागेल.


https://ott.mahardd.in/


वरील लिंक ला टच करून बदली पोर्टल ओपन केल्यानंतर पोर्टलवर होकार किंवा नकार कसा नोंदवावा हे व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा.




संवर्ग 1 शिक्षकांचे लॉग-इन आता सक्षम केले आहे. कृपया शिक्षकांनी फॉर्म भरावा आणि बदलीसाठी होकर किंवा नकाराची पुष्टी करावी.


📌पुष्टी करण्याचा शेवटचा दिवस 8 मार्च 2023 आहे. कृपया शिक्षकांना वेळेवर प्रक्रिया पूर्ण करायची आहे.


✳️ बदली अपडेट.

 संवर्ग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून नकार कसा नोंदवावा.


संजय नागे 


✳️ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचा राऊंड करिता पोर्टल सुरू झालेले आहे  संवर्ग एक मध्ये असलेल्या शिक्षकांनी कृपया आपला नकार पोर्टलवर नोंदवावा जेणेकरून आपली बदली अवघड क्षेत्रात होणार नाही.


✳️ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 मध्ये यापूर्वी जरी आपण नकार नोंदवलेला असला तरीही कृपया पोर्टलवर जाऊन लॉगिन करून पहावे शक्यतो यापूर्वी नकार नोंदवलेल्या शिक्षकांना पुन्हा नकार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही तरीही शहानिशा करण्याकरिता पोर्टल ओपन करून पहावे व जर नकार नोंदवता येत असेल तर नकार नोंदवावा.


✳️ अत्यंत महत्त्वाचे नकार कसा नोंदवावा.


ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी असल्यास म्हणजेच नकार द्यावयाचा असल्यास किंवा असलेल्या शाळेवरून बदली नको असल्यास.

खालील पोर्टल वरील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होय (Yes) नोदवावे.


माझे नाव अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या यादीत आले असून मला बदलीतून सूट हवी आहे ? --- होय Yes. 


संवर्ग एक चे शिक्षक बदली करिता नकार नोंदवणार आहेत म्हणजेच आहे त्या शाळेवरून बदली मागणार नाहीत त्यामुळे होकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले नाही.


✳️टप्पा क्रमांक सात मधील शिक्षकांनी आपला नकार कसा नोंदवावा.


✳️ संवर्ग १ मधील नकार देणे साठी स्टेप.


➡️ 1 ) खालील साईडला क्लिक करून लॉगीन करा. 


https://ott.mahardd.in/


➡️ 2 ) मोबाईल नं टाका.


➡️ 3 ) आलेला otp व captcha टाका.


➡️ 4 ) सूचना मराठीत पाहिजेत असतील उजव्या हाताला वरील बाजूस मराठी भाषा निवडा.


➡️ 5 ) अस्वीकरण स्वीकारा 


➡️ 6 ) डाव्या बाजूला दिलेल्या बाबीमधून जिल्हा अंतर्गत निवडा.


➡️ 7 ) त्यातील अर्ज हा मुद्दा क्लिक करा.


➡️ 8 ) अर्जाचा प्रकार निवडा.


➡️ 9) अर्ज open झाल्यावर.


➡️ 10 ) तुम्हाला बदलीतून सुट हवी आहे का.


➡️ 11 ) Yes निवडा.


➡️ 12 ) त्या यादीतील अर्जदार संवर्ग १ मधील कोणत्या प्रकारात आहे ते निवडा.


➡️ 13 ) submit करा.


➡️ 14 ) पुन्हा आलेला otp पाठवा हा option टाकल्यावर.


➡️ 15 ) आलेला otp टाका.


➡️ 16 )त्यानंतर काही वेळातच आपल्या इमेलवर मेसेज द्वारे अर्जाची पीडीएफ प्राप्त होईल.


✳️ महत्त्वाचे मुद्दे


➡️ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या या टप्प्या मध्ये बदलीचा संदर्भ दिनांक 30 जून 2022 असेल.


➡️ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या टप्प्यामध्ये पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या वास्तव सेवा जेष्ठतेने म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा जेष्ठतेने करण्यात येतील.


➡️ सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची 10 अथवा 10 पेक्षा जास्त वर्षे सेवा झाली आहे या शिक्षकांना शाळेवरील सेवेची अट राहणार नाही अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाईल.


✳️ नकाराची सुविधा खालील प्रकारचे शिक्षक घेऊ शकतील.


➡️ जे शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असून सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष न झाल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत असे शिक्षक या टप्प्यामध्ये नकार देऊन आपली बदली टाळू शकतात.


➡️ ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता होकार दिला होता परंतु त्यांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात व ते नकार देऊन बदली टाळू शकतात.


➡️ तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष झाले असताना सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये होकार किंवा नकार नोंदवला नव्हता अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात असे शिक्षक सुद्धा या बदली टप्प्यामध्ये नकार नोंदवून बदली टाळू शकतात.


➡️ विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना  आपण संवर्ग एक मध्ये येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील सादर केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पडताळण्यासाठी 30 जून 2022 ही तारीख प्रमाणित धरण्यात येईल.


✳️ सदर बदली टप्प्यांमध्ये खालील शिक्षकांचा समावेश होणार नाही


➡️ जिल्हातर्गत बदली प्रक्रिया 2022 च्या बदली प्रक्रियेमध्ये यापूर्वी कोणत्याही संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही.


➡️ ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वीच बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता नकार दिलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही 


➡️ तसेच याआधी बदलीपात्र शिक्षकाने, विशेष संवर्ग 1 मधून अर्ज भरताना बदलितून सूट हवी आहे का या प्रश्नाला नकार नोंदवला व पसंती क्रम न भरल्यामुळे त्या शिक्षकाची विस्थापित राउंडमध्ये बदली झाली.


➡️ विशेष संवर्ग भाग एक च्या ज्या शिक्षकांनी बदली करिता होकार नोंदवून बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही.


➡️ ज्या विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांचाही समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही.


 


धन्यवाद! 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.