सारथी शिष्यवृत्ती अपडेट - वर्ग नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांचे पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे बाबत सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे परिपत्रक

 सारथी शिष्यवृत्ती अपडेट - वर्ग नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांचे पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे बाबत सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांचे परिपत्रक.


2022 या शैक्षणिक वर्षाकरिता छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी यालक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्याबाबत सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी पुढील प्रमाणे पत्रनिर्गमित केले आहे.


समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावी त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे एन एम एम एस परीक्षेचे मुख्य उद्देश आहे. सदरची परीक्षा सन 2007 2008 पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत इयत्ता आठवीच्या वर्षाखेरीस घेतली जाते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती योजना सन 2021 22 पासून लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील एन एम एम एस ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या केवळ चार लक्षित गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता नववी इयत्ता बारावी पर्यंत नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांचे मार्फत छत्रपती राजाराम महाराज सार्थी शिष्यवृत्ती योजना सन 2021 22 या वर्षापासून सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना यादी योजनेचा लाभ 2021 22 मध्ये झाला आहे. सदरची शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी पासून ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून सन 2021 22 मध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली ही योजना यावर्षी इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या व लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे.

सारथी संस्थेने सदर छत्रपती राजा महाराज सारथी शिष्यवृत्ती अर्ज करू इच्छिणाऱ्यांना लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना मुख्याध्यापकाची शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर मसुदा तयार केला असून याविषयी आपल्या कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व यांना कळविण्यात यावे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र असलेल्या माध्यमिक शाळांना कळवावे तसेच अर्ज सादर करताना खालील सूचना माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विचारात घेणे बाबत अवगत करावे.

1) National Merit cum Means Scholarship (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेली व केंद्र शासनाच्या मेरिट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी शिष्यवृत्ती साठी घेऊ नयेत.

2) एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त असलेल्या मराठा खुला संवर्ग कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी ओबीसी संवर्ग या चार लक्षीत गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्ती स्वीकारावेत.

3) विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती खाली दिलेल्या लिंक वर भरावी व सोबत दिलेल्या नमुन्यातच हार्ड कॉपी आवश्यक त्या सत्यप्रती सह सादर करावी.

4) महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.

5) खालील विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेसाठी अपात्र आहेत म्हणून खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठीही अपात्र आहेत अशा विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारू नये.

A) विनाअनुदानित शाळेत विकणारे विद्यार्थी.

B) केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

C) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

D) शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी.

E) सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

6) प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे म्हणजेच आई वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न रुपये दीड लक्ष पेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी तसीलदाराच्या स्वाक्षरीत असलेला चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी.

7) मुख्याध्यापकांनी वर्गशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती सार्थीने दिलेल्या पुढील लिंक वर भरावी. इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे लिंक देण्यात आली आहे.

A) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी

https://forms.gle/DX3tLdkyGzhqtK1v8

वरील लिंक वर माहिती इंग्रजी भाषेत भरावी.

B) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी.. 

https://forms.gle/f3Uf1tpETLxcAyX9

वरील लिंक वर माहिती इंग्रजी भाषेत भरावी.

8) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सोबत खालील प्रमाणे कागदपत्र सादर करावे.. 

A) विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्ती मागणी अर्ज इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी स्वतंत्र अर्ज नमुना तयार केला आहे तो सोबत जोडला आहे.

B) विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे स्वाक्षरी असलेले शिफारस पत्र.

C) विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारा च्या स्वाक्षरीतील सन 2022 23 या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्यप्रत.

D) विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्यप्रत.

E) विद्यार्थ्यांची स्वतःची नावे बँक खाते असलेल्या पासबुक च्या पहिल्या पानाची सत्यप्रत त्यावर नाव खाते क्रमांक आयएफएससी कोड सह नमूद असणे आवश्यक आहे.

F) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षा 55% गुणासह उत्तीर्ण असलेल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांनी जोडावी.

G) एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक निकाल पत्रक.

H) अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडू नये.


वरील संपूर्ण परिपत्रक व अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments