पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणाारे परिणाम व त्याबाबत अवणलंबण्याची कार्यवाही..
बऱ्याच वेळा शासकीय कर्मचारी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती यादीमध्ये त्यांचे नाव येऊनही गैरसोय टाळण्यासाठी पदोन्नती स्वीकारत नाही अशा परिस्थितीत त्यांना कोणतं नियम लागू होतात या सदर्भातला शासन निर्णय आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णयानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने पदोन्नती नाकारल्यावर अशा प्रकरणी कशाप्रकारे कार्यवाही करावी याबाबत 30 एप्रिल 1991 त्या शासन निर्णयान्वये दिलेली असून वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यास एखाद्या सेवकांनी पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दर्शवला त्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या सेवकांच्या यादीतून काढून टाकण्याबाबत व पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड यादी त्यानंतर जेव्हा बनवण्यात येईल त्यावेळी त्या कर्मचार्याच्या प्रकरणाचा गुणवत्तेप्रमाणे पुन्हा विचार करण्याबाबत शासन आदेश दिलेले आहेत सदरहू शासन आदेश अंमलात असून देखिल काही अधिकारी कर्मचारी वैयक्तिक कारणास्तव वारंवार पदोन्नती ना करत असल्याचे आढळून आले आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नती न करण्याच्या प्रवृत्तीस आळ घालण्यासाठी संदर्भात दिन शासन निर्णयामध्ये बदल करण्यासंबंधीची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर शासन निर्णयामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
१) वरच्या संवर्गात पदोन्नती साठी निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वी एखाद्या कर्मचाऱ्या ने पदोन्नतीचे पद स्वीकारण्यास नकार दर्शवली अस त्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी निवड यादीतून काढून टाकण्यात यावे व पुढील दोन वर्षी होणाऱ्या निवड सूची मध्ये संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षाच्या निवड सुचित संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदोन्नती साठी ची पात्रता तपासून घेण्यात यावी त्यावेळेच्या गुणवत्तेप्रमाणे संबंधित अधिकारी-कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरल्यास नियमित निवड सुचित समावेश करण्यात यावा.
२) ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी पदोन्नती नाकारली आहे त्यांचा पुढील कोणत्याही निवड सूची करता समावेश करण्यात येऊ नये.
३) ज्या अधिकारी-कर्मचारी यांचा पहिल्या वेळेस पदोन्नती नाकारल्यानंतर तीन वर्षानंतर दुसऱ्या वेळेस निवड सूची करता विचार करण्यात आल्यानंतर संबंधित अधिकारी कर्मचारी उन्नतीस पात्र ठरल्यास मात्र संबंधित अधिकारी कर्मचारी पुन्हा पदोन्नती नकार दिल्यास त्याचा त्या निवड सुचित व पुढील दोन वर्षाच्या निवड सूची विचार करण्यात येणार नाही याप्रमाणे पुढील प्रत्येक वेळेस वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
४) ज्या प्रकरणात निवड सूची तयार करण्याची कार्यवाही पुढील दोन वर्षे न होता तिसऱ्या वर्षी निवड सूची केल्यास पहिल्या वेळेस पदोन्नती न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा तिसऱ्या वर्षीच्या निवड सूचीत पदोन्नतीसाठी विचार करण्यात यावा.
वरील आदेश हा सन 2016 17 चा निवडून ची वर्षा पासून तयार करण्यात येणारे निवड सूचना लागू राहतील तसेच सदर आदेश सर्व मंत्रालय विभागाच्या आपल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे अशा प्रकारचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 12 /9 /2016 रोजी निर्गमित केला आहे..
सदर आदेश आपल्या साठी वर फोटो स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे आहे हा आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करावे..
वडील डाउनलोड वर क्लिक करुन आपण सदर आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता स्वतः जवळ जतन करून ठेवू शकता आणि त्याची प्रिंट काढून ठेवू शकता..
अशाच शासकीय कार्यालयीन कामकाज संबंधी शासन आदेश मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला..
व्हिडिओ स्वरूपात माहिती मिळवण्यासाठी भेट द्या आमच्या खालील यूट्यूब चैनल ला...
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!
0 Comments