TET Exam Maharashtra 2024 Update - टीईटी २०२४ परीक्षा आता ऑगस्ट महिन्यात राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची माहिती

महाराष्ट्रासाठी शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी एक्झामिनेशन TET 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात होणार असल्याचे संकेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिले आहेत. 


वर्ग पहिली ते आठवीसाठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी सदर परीक्षा आवश्यक करण्यात आलेली आहे. 


 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेकडे अनेक उमेदवार डोळे लावून बसले आहेत. परंतु परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू असून, येत्या ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उमेदवारांना आणखी काही दिवस परीक्षेची वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. काही जिल्ह्यांत पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या असून, काही ठिकाणी लोकसभा व विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु, टीईटी घोटाळा समोर आल्यावर २०२१ नंतर एकही टीईटी परीक्षा घेतली गेली नाही. त्यातच टीईटी परीक्षा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन यावर लवकर निर्णय झाला नाही. मात्र, आता टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असून, त्यादृष्टीने परीक्षा परिषदेतर्फे तयारी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, परीक्षा परिषदेतर्फे टीईटी घेण्याबाबत तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा येत्या ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.