HSC Board ReExam Online Application - इ. १२वी पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत बोर्डाचे प्रकटन व लिंक.

 दिनांक 24 मे 2024 रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे जुलै ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी पुरवणी आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश व वेळापत्रक दिले आहे.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक २१/०५/२०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झालेला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, III विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इयत्ता १२वी साठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे.


सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे

१ ऑनलाईन आवेदनपत्र भरतांना फेब्रु मार्च २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.

२ श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या फेब्रु मार्च २०२४ परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रु मार्च २०२५ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

३ सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित

केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.

४ आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

दिनांक २४/०५/२०२४

(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे -४

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.