ज्येष्ठतेचे सर्वसाधारण तत्वे, दरवर्षी ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे नियम अधिसूचना/कायदा.

महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 21 जून 2021 रोजी प्रसिद्ध केलेली सेवाजेष्ठता विषयक अधिसूचना/कायदा. ज्येष्ठतेचे सर्वसाधारण तत्वे.-

(१) शासकीय कर्मचा-यांच्या अखंडीत सेवा कालावधीवरुन त्याची ज्येष्ठता निश्चित करणे. या नियमावलीतील अन्य तरतुदीच्या अधिनतेने, शासकीय कर्मचा-याची कोणत्याही पदावरील, सवर्गातील किवा सेवेतील ज्येष्ठता सामान्यपणे त्याच्या त्या पदावरील, संवर्गातील किंवा सेवेतील अखसित सेवाकालावरून निश्चित करण्यात येईल:

परंतु, जेव्हा रजा किया प्रशिक्षण किया प्रतिनियुक्ती किंवा स्वीयेतर सेवा किंवा कोणत्याही अन्य पदावरील अस्थायी स्थानापन्नता, या कारणास्तव त्या पदावर, सवर्गात किवा सेवेत त्या त्या कर्मचाऱ्याची अनुपस्थिती होईल तेव्हा, तो कर्मचारी रजेवर किंवा प्रशिक्षणास किंवा प्रतिनियुक्तीवर किंवा स्वीयेतर सेवेवर किंवा कोणत्याही अन्य पदावर अस्थायी स्थानापन्नतेवर गेला नसता तर एरव्ही तो उक्त पदावर, संवर्गात किवा सेपेत राहिला असता असे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केले तर, असा कोणताही अनुपस्थितीचा कालावधी हा अशा अखंडीत सेवाकालाची गणना करण्याच्या प्रयोजनार्थ विचारात घेतला जाईल;

परंतु असे की, ज्या प्रकरणी राक्षम प्राधिकाऱ्याने संबंधित रोया प्रवेश नियमात विहित केलेल्या नियुक्तीच्या मार्गाच्या प्रमाणानुसार काटेकोरपणे नियमित नियुक्ती करणे तत्कालीन प्राप्त परिस्थितीनुसार सोयीचे नसल्याचे किया शक्य नसल्याचे किंवा व्यवहार्य नसल्याचे प्रमाणित केले आहे अशी प्रकरणे वगळून शासकीय कर्मचाऱ्याने अभावित नियुक्ती म्हणून काही सेवा केली असल्यास, ती सेवा अखडीत सेवाकालाच्या गणनेतून वगळली जाईल आणि संबंधित सेवाभरती नियमावलीतील तरतूदीनुसार त्याची रीतसर नियुक्ती ज्या दिनाकास झाली असेल त्या दिनांकास तो त्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत नियुक्त झाला होता असे ज्येष्ठतेच्या प्रयोजनार्थ मानले जाईल:

परंतु आणखी असे की, कायम स्वरुपी समावेशनासंदर्भात केलेल्या तरतुदीनुसार एखाद्या मूळ नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या अधिपत्याखालील कोणत्याही पदावरुन, संवर्गातून किंवा सेवेतून शासकीय कर्मचाऱ्याचे त्याच्या स्वतःच्या विनंतीवरुन शासनातील दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या अधिपत्याखालील अन्य पदावर, संवर्गात किवा सेवेत, कायमस्वरुपी समावेशन झाल्यास, ज्येष्ठतेच्या प्रयोजनार्थ शासकीय कर्मचाऱ्याची आधीची सेवा ही अखंडीत सेवा म्हणून समावेशन झालेल्या पदासाठी ग्राह्य धरली जाणार नाही. समावेशनाद्वारे ज्या अन्य पद, संवर्ग किवा सेवेत शासकीय कर्मचाऱ्याची रीतसर नियुक्ती ज्या दिनाकास झाली असेल त्या दिनांकापासून संबंधित कर्मचाऱ्याची त्या पदावरील, संवर्गातील किवा सेवेतील ज्येष्ठता विचारात घेतली जाईल.

परंतु आणखी असे की, महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ मधील धारणाधिकाराच्या तरतुदीच्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यास मूळ पदावर पुनर्नियुक्ती दिल्यास, सबंधित कर्मचाऱ्याची ज्येष्ठता पुनर्नियुक्ती आदेशानुसार मूळ पदावर नव्याने रुजू झाल्याच्या दिनांकापासून विचारात घेतली जाईल, असा शासकीय कर्मचारी त्याच्या मूळ पदावरील पूर्वीच्या सेवेच्या कारणास्तव ज्येष्ठतेबाबतचे कोणतेही लाभ मिळण्यास पात्र असणार नाही:

परंतु असे की, शासनाने आढाव्याअंती अतिरिक्त ठरविलेल्या कर्मचाऱ्यास समकदा पदावर संवर्गात किवा सेवेत पुनर्नियुक्तीद्वारे नियुक्ती दिल्यास, अशा पदावरील ज्येष्ठतेकरिता शासकीय कर्मचाऱ्याची पूर्वीच्या पदावरील सेवा ही अखडीत सेवा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. अशा शासकीय कर्मचाऱ्याची अन्य समकक्ष पदावर किंवा संवर्गात किवा सेवेत पुनर्नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून त्याची ज्येष्ठता विचारात घेतली जाईल.


ज्येष्ठतेचा दिनांक व ज्येष्ठतेचा क्रमांक निश्चित करणे.- 

(अ) ज्येष्ठतेचा दिनांक- या नियमावलीतील अन्य तरतूदीच्या अधीनतेने, कोणत्याही पदावर, सवर्गात किया सेवेत, मूळ शिफारस यादीनुसार अथवा प्रतिक्षा यादीनुसार येट भरती झालेली व्यक्ती किया नियमित निवडसूचीतून नियमित अथवा तात्पुरती पदोन्नती मिळालेली व्यक्ती, विहित मुदतीत प्रत्यक्ष ज्या दिनांकास शासकीय सेवेत रुजू होईल त्या दिनांकास त्याचा त्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत ज्येष्ठतेचा दिनांक निश्चित केला जाईल. परतु, संबंधित पदाच्या रिक्ततेचा दिनांक हा ज्येष्ठतेचा दिनांक म्हणून अनुज्ञेय राहणार नाही.

(1) थेट भरती झालेल्या व्यक्तीचा ज्येष्ठतेचा क्रमांक पोटनियम (१) आणि पोटनियम (२) मधील खंड (अ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी,-

(1) मूळ शिफारस यादीनुसार एकाच तुकडीत निवड होऊन थेट भरतीद्वारे नियुक्त झालेल्या व विहित मुदतीत रुजू झालेल्या व्यक्तींचा आपापसातील ज्येष्ठतेचा क्रमांक हा आयोगाने वा निवड मंडळाने दिलेल्या मूळ शिफारस यादीतील क्रमानुसार (अनुक्रमांकानुसार) निर्धारित केला जाईल,

(ii) मूळ शिफारस यादीतील तमेदवार विहित मुदतीत हजर न झाल्यास आणि संबंधित पदाची प्रतिक्षायादी ठेवण्यात येत असल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रतिक्षायादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतल्यास, आणि असे प्रतिक्षायादीतील उमेदवार विहित मुदतीत रुजू झाल्यास, त्यांचा आपापसातील ज्येष्ठतेचा क्रमांक हा आयोगाने या निवड मंडळाने प्रतिक्षायादीमध्ये लावलेल्या क्रमानुसार (अनुक्रमांकानुसार) निर्धारित केली जाईल, अशा उमेदवाराना उपरोक्त उपखंड (६) नुसार ज्येष्ठतेचे लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत,

(11) पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठता क्रमांक, खंड (अ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, नियमित निवडसूचीतून पदोन्नती मिळालेले शासकीय कर्मचारी, विहित मुदतीत पदोन्नतीच्या पदावर रुजू झाल्यास, त्यांचा आपापसातील ज्येष्ठतेचा क्रमांक हा, निवडसूचीत त्यांची नावे ज्या क्रमाने दर्शविली आहेत त्याच क्रमानुसार निर्धारित केली जाईल: परंतु, जर नियमित निवडसूची दोन किंवा अधिक भागात तयार केलेली असेल तर,

आधीच्या भागात समाविष्ट झालेल्या सर्व व्यक्तीचा क्रम हा नंतरच्या भागातील समाविष्ट केलेल्या व्यक्तीच्या वर लागेल:

परतु असे की, नियमित निवडसूचीतील नावे ज्या क्रमाने लावलेली आहेत तो क्रम मागाहून आढावा घेतल्यामुळे बदलण्यात आला तर, संबंधित शासकीय कर्मचा-यांचा ज्येष्ठताक्रम त्यांच्या या सुधारित क्रमानुसार फेरमांडणी करण्यात येऊन निर्धारित केला जाईल:

परंतु आणखी असे की, या नियमावलीतील नियम ४ मधील पोटनियम (४) ते पोटनियम (७) नुसार, शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर केला असेल तर सदर मानीव दिनांकानुसार संबंधित वर्षाच्या ज्येष्ठतायादीमध्ये सदर शासकीय कर्मचान्यास लगतच्या ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याच्या क्रमांकानंतर "अ" लावून तसा क्रमांक देऊन त्यांच्या नावाचा समावेश करण्यात यावा.


ज्येष्ठतायादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचे निकष -

(अ) थेट भरतीने नियुक्ती- कोणत्याही पदावर, संवर्गात किया सेवेत विहित मार्गाने थेट भरती झालेल्या व्यक्तीची नियुक्ती ही तात्पुरती अथवा नियमित यापैकी कोणत्याही स्वरुपाची असली तरी त्या व्यक्तीची ज्येष्ठता सदर नियमातील पोटनियम (२) मधील खंड (अ) आणि पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (1) नुसार निश्चित करावी व नियम ५ नुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठतायादीमध्ये सदर व्यक्तीच्या नावाचा ज्येष्ठतेनुसार समावेश करण्यात येईल. जर सदर नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असेल तर, ज्येष्ठतायादीमधील शेरा या रकान्यामध्ये, सदर नियुक्ती ही कोणत्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपाची आहे याचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात येईल.

(ब) नियमित अथवा तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्ती. कोणत्याही पदावर, संवर्गात किंवा सेवेत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, पदोन्नतीच्या कोटयातील पदावर पदोन्नती देण्यासाठी तयार केलेल्या नियमित निवडसूचीद्वारे, नियमित अथवा तात्पुरती पदोन्नती दिल्यानंतर, संबंधित शासकीय कर्मचाऱ्याची पदोन्नती नियमित अथवा तात्पुरती यापैकी कोणत्याही स्वरुपाची असली तरी, त्या शासकीय कर्मचाऱ्याची, पदोन्नतीच्या पदावर, संवर्गात किंवा सेवेत या नियमाच्या पोटनियम (२) मधील खंड (अ) आणि पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (II) नुसार ज्येष्ठता निश्चित करावी व नियम ५ मध्ये नमूद केल्यानुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठतायादीमध्ये सदर शासकीय कर्मचाऱ्याच्या नावाचा समावेश करण्यात येईल. जर सदर पदोन्नती ही तात्पुरत्या स्वरुपाची असेल तर, ज्येष्ठतायादीमधील शेरा या रकान्यामध्ये, सदर पदोन्नती ही कोणत्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपाची आहे याचे कारण स्पष्टपणे नमूद करण्यात येईल.

तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती. तदर्श निवडसूचीद्वारे तदर्थ पदोन्नती दिल्यास, संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास तदर्थ पदोन्नतीच्या पदावरील, संवर्गातील किवा सेवेतील ज्येष्ठतेचा लाभ मिळण्यास ते पात्र असणार नाहीत. यास्तव, सदर शासकीय कर्मचाऱ्याची या नियमाच्या पोटनियम (२) मधील खंड (अ) आणि पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (II) नुसार ज्येष्ठता निश्चित केली जाणार नाही व नियम ५ नुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठतायादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश केला जाणार नाही. त्यामुळे त्याचे नाव निम्न संवर्गातील ज्येष्ठतायादीतून वगळले जाणार नाही:

परतु, तदर्थ पदोन्नती ज्या दिनाकास पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदावर नियमित होईल, त्या दिनांकास संबंचित शासकीय कर्मचाऱ्याची ज्येष्ठता सदर नियमाच्या पोटनियम (२) मधील खंड (अ) आणि पोटनियम (२) मधील खंड (व) मधील उपखंड (II) नुसार निश्चित केली जाईल व पदोन्नती नियमित झाल्याच्या दिनाकापासून त्याचे नाव नियम ५ नुसार तयार करण्यात येणाऱ्या ज्येष्ठतायादीमध्ये अंतर्भूत केले जाईल.

स्पष्टीकरण- ज्येष्ठतायादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याबाबतची संक्षिप्त कार्यपध्दती, या नियमावली सोबत जोडलेल्या परिशिष्ट- एक प्रमाणे असेल.


४. ज्येष्ठतेचा मानीव दिनांक निर्धारित करणे..

(१) नियम ३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी पुढील पोटनियमात अंतर्भूत केलेल्या तरतुदीनुसार, सक्षम प्राधिकारी शासकीय कर्मवान्यास एखादे पद, संवर्ग किंवा सेवा यामधील त्याच्या प्रत्यक्ष नियुक्तीच्या दिनांकापेक्षा वेगळा असा दिनांक संबंधित पदावरील नियुक्तीचा मानीव दिनांक म्हणून नेमून देऊ शकेल आणि असा मानीव दिनांक निर्धारित करण्यात उक्त पद, संवर्ग किवा सेवा यातील त्याचा सेवाकाल त्या दिनांकापासून सुरू झाला असे समजून त्याच्या ज्येष्ठतेची गणना केली जाईल.

परंतु असे की, दोन किंवा अधिक व्यक्तींना एकच मानीव दिनांक निर्धारीत केल्यास, अशा प्रकरणी थेट भरतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा ज्येष्ठताक्रम हा आयोगाच्या किंवा निवडसमितीच्या शिफारस क्रमानुसार निश्चित करावा आणि पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्याचा ज्येष्ठताक्रम हा, पदोन्नतीच्या पदाच्या निम्न संवर्गातील ज्येष्ठतायादीतील त्याच्या क्रमानुसार निश्चित करावा.


(२) थेट भरती झालेल्या व्यक्तीचा ज्येष्ठतेचा मानीव दिनांक.-

(अ)मूळ शिफारस यादी. जेव्हा मूळ शिफारस यादीतील एकाच तुकडीत निवड होऊन, थेट भरती झालेल्या व्यक्ती, वेगवेगळ्या दिनांकास कामावर रुजू झाल्या असतील आणि जर प्रत्यक्षात कामावर रुजू झाल्याचे दिनाक कालानुक्रमे, नियम ३ मधील पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (1) मधील परिच्छेद (1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे निर्धारीत केलेल्या त्यांच्या आपापसातील ज्येष्ठताक्रमाशी अनुरुप नसतील तर, जी सरळसेवेने नियुक्त होणारी व्यक्ती वरच्या क्रमावर असेल, पण त्याच्यापेक्षा कनिष्ठ क्रमावर असलेल्या व्यक्तीच्या नतर कामावर रूजू झाली असेल, तर त्या व्यक्तीला कनिष्ठ क्रमावर असलेली व्यक्ती ज्या दिनांकास कामावर रुजू झाली असेल, तो दिनांक त्याच्या नियुक्तीचा मानीव दिनांक म्हणून नेमून दिला जाईल. मात्र, विहित मुदतीनंतर थेट नियुक्ती अनुज्ञेय नसल्यामुळे, वरया क्रम असलेली व्यक्ती विहित मुदतीतय कामावर रुजू झाली असली पाहिजे,


प्रतिक्षायादी. जेव्हा प्रतिक्षायादीतील एकाच तुकडीत निवड होऊन, थेट भरती झालेल्या व्यक्ती, वेगवेगळ्या दिनाकास कामावर रुजू झाल्या असतील आणि जर प्रत्यक्षात कामावर रुजू झाल्याचे दिनांक कालानुक्रमे, नियम ३ मधील पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (1) मधील परिच्छेद (ii) मध्ये नमूद केल्याप्रमाणे निर्धारीत त्यांच्या ज्येष्ठताक्रमाशी अनुरुप नसतील तर, जी सरळसेवेने नियुक्त होणारी व्यक्ती वरच्या क्रमावर असेल, पण त्याच्यापेक्षा कनिष्ठ क्रमावर असलेल्या व्यक्तीच्या नंतर कामावर रूजू झाली असेल, तर त्या व्यक्तीला कनिष्ठ क्रमावर असलेली व्यक्ती ज्या दिनांकास कामावर रूजू झाली असेल, तो दिनांक त्याच्या नियुक्तीचा मानीव दिनांक म्हणून नेमून दिला जाईल. मात्र, विहित मुदतीनंतर थेट नियुक्ती अनुज्ञेय नसल्यामुळे, वरचा क्रम असलेली व्यक्ती विहित मुदतीतच कामावर रुजू झाली असली पाहिजे.

 (३) मूळ शिफारस यादी अथवा प्रतिक्षायादीनुसार थेट भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास, त्याच्या चारित्र्य अभिलेख्याच्या अनुषंगाने उशिराने नियुक्ती दिली असल्यास. थेट नियुक्त उमेदवारावर गुन्हा नोंद झाल्याचे / न्यायालयीन खटला चालू असल्याचे अथवा पूर्वीच्या सेवेच्या अनुषंगाने विभागीय चौकशी चालू असल्याचे कागदपत्रांच्या आधारे आढळून आल्यास आणि चारित्र्य पडताळणी संदर्भात निर्णय घेण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीने, जर संबंधित उमेदवारास शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला तर, संबंधित उमेदवार ज्या दिनांकास शासन सेवेत रुजू होईल तोच दिनांक त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक राहील आणि अशा उमेदवारास सदर नियमानुसार मानीव दिनांक म्हणून अनुज्ञेय राहणार नाही.

उदाहरण - नियम ४ च्या पोटनियम (२) व पोटनियम (३) नुसार थेट नियुक्त उमेदवारास कशाप्रकारे ज्येष्ठतेचा मानीव दिनांक द्यावा ही बाब अधिक स्पष्ट होण्याच्या अनुषंगाने सुलभ संदर्भासाठी सोबतच्या परिशिष्ट- दोन मधील उदाहरण पहावे.


(४) पदोन्नत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा ज्येष्ठतेचा मानीव दिनांक.-

(अ) जेव्हा कोणत्याही निवडसूचीप्रमाणे जे दोन किंवा अधिक शासकीय कर्मचारी कोणतेही वरचे पद, संवर्ग किंवा सेवा यातील पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशांना अशी वरची पदे, संवर्ग किवा सेवा यामध्ये पदोन्नती मिळाली असेल आणि वेगवेगळ्या दिनांकास ते पदोन्नतीच्या पदावर रूजू झाले असतील आणि जर प्रत्यक्षात रुजू झाल्याचे दिनाक कालानुक्रमे, नियम ३ मधील पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (II) मध्ये नमूद केल्याप्रमाणे निर्धारीत केलेल्या त्यांच्या आपापसातील ज्येष्ठताक्रमाशी अनुरुप नसतील तर, एखादी ज्येष्ठ व्यक्ती त्याच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या व्यक्तीच्या नंतर कामावर रूजू झाली असेल, तर तिला, कनिष्ठ असलेली व्यक्ती ज्या दिनांकास कामावर रूजू झाली असेल, तो दिनांक त्याच्या नियुक्तीचा मानीव दिनांक म्हणून नेमून दिला जाईल: परंतु, विहित मुदतीत पदोन्नतीच्या पदावर रुजू न होण्यास, संबंधित शासकीय कर्मचारी स्वतः जबाबदार असल्याचे आढळून आल्यास, त्याची ज्येष्ठता ही तो पदोन्नतीच्या पदावर प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकानुसार निर्धारीत केली जाईल.

पदोन्नत व्यक्तीचा ज्येष्ठताक्रम, नियम ३ मधील पोटनियम (२) मधील खंड (ब) मधील उपखंड (II) मधील दुसऱ्या परंतुकात तरतूद केल्याप्रमाणे फेरमांडणी करून निर्धारित केला तर त्या बाबतीत. त्यांना पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यात येईल किंवा जर आढाव्यानुसार फेरमांडणी करण्याआधीच मानीव दिनांक दिलेला असेल तर, फेरमांडणी करून निर्धारित केलेल्या त्यांच्या ज्येष्ठताक्रमांशी कालानुक्रमे अनुरूप होईल अशा तन्हेने सदर मानीव दिनांक सुधारीत करण्यात येतील,

(५) शिस्तभंगविषयक कारवाईच्या निष्कर्षानुसार पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे. ज्या शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई चालू असल्यामुळे त्यास पदोन्नती देण्यात आलेली नाही असा कर्मचारी कालांतराने शिस्तभंगविषयक कार्यवाहीअंती निर्दोष मुक्त झाल्यास, अशा शासकीय कर्मचाऱ्याची प्रत्यक्ष पदोन्नती झाल्यावर त्याला शिस्तभंगविषयक कारवाईमुळे डावलण्यात आले नसते तर ज्या दिनांकास त्याची नियमित पदोन्नती झाली असती तो दिनांक त्याच्या नियमित पदोन्नतीचा मानीव दिनांक म्हणून नेमून देण्यात येईल:

परंतु, ज्या शासकीय कर्मचाऱ्यास जाणीवपूर्वक निर्णय घेऊन शिस्तभंगाविषयक कार्यवाहीच्या निर्णयाच्या पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदावर तात्पुरती पदोन्नती देण्यात आलेली असेल व असा कर्मचारी कालांतराने शिस्तभंगविषयक कार्यवाहीअंती निर्दोष मुक्त झाल्यास, अशा शासकीय कर्मचाऱ्यास शिस्तभंगविषयक कारवाईमुळे डावलण्यात आले नसते तर ज्या दिनांकास त्याची नियमित पदोन्नती झाली असती तो दिनांक त्याच्या पदोन्नतीचा मानीव दिनांक म्हणून नेमून देण्यात येईल.

(६) पदोन्नतीच्या वेळी खुल्या ठेवलेल्या प्रकरणी पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे. असताना जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याचे प्रकरण खुले ठेवण्यात आले असेल निवडसूची तयार करीत आणि ज्या प्रयोजनास्तव प्रकरण खुले ठेवले आहे त्याचे कालांतराने निरसन झाले आणि अशा शासकीय कर्मचाऱ्याची त्यानंतर पदोन्नती झाल्यावर, जर त्याचे प्रकरण खुले ठेवले नसते तर ज्या दिनांकास त्याला नियमित पदोन्नती देय झाली असती तो दिनांक त्याला पदोन्नतीचा मानीव दिनांक म्हणून नेमून देण्यात येईल.

(७) पदोन्नतीच्या वेळी डावलण्यात आलेल्या प्रकरणी पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे. निवडसूची तयार करीत असताना जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास डावलण्यात आले आणि त्याच्या प्रकरणाचा फेर आढावा घेताना एकतर सक्षम प्राधिकान्याने स्वतः होऊन किवा न्यायालयाने किवा त्या संबंधात अधिकार प्रदान केलेल्या अन्य कोणत्याही प्राधिका-याने जर डावलल्याची कार्यवाही मागाहून रद्द ठरवली तर, अशा शासकीय कर्मचान्यास प्रत्यक्ष पदोन्नतीच्या वेळी याप्रमाणे डावलण्यात आले नसते तर ज्या दिनांकास त्याला नियमित पदोन्नती देय झाली असती तो दिनांक त्याला पदोन्नतीचा मानीव दिनांक म्हणून नेमून देण्यात येईल.


५. दरवर्षी ज्येष्ठतायादी प्रसिध्द करणे.-

प्रत्येक सक्षम प्राधिकारी त्याच्या नियंत्रणाखालील प्रत्येक संवर्गाची, प्रतिवर्षी दिनांक १ जानेवारी रोजीची, त्या संवर्गात मागील वर्षी प्रत्यक्षात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची, अंतिम ज्येष्ठतायादी, सोबत जोडलेल्या परिशिष्ट ३ येथील विहित नमुन्यात, प्रसिध्द करेल, अशी कार्यवाही करताना नियम ३ मधील पोटनियम (३) मध्ये नमूद निकष विचारात घेईल. अंतिम ज्येष्ठता यादी शासकीय संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. नियम ४ नुसार एखादया शासकीय कर्मचाऱ्यास मानीव दिनांक मंजूर केल्यास, त्यानुसार अंतिम ज्येष्ठतायादीकरीता शुध्दीपत्रक तात्काळ प्रसिध्द करण्यात येईल.


प्रत्येक वर्षी प्रत्येक संवर्गाची ज्येष्ठतायादी खालीलप्रमाणे तयार करुन प्रसिध्द करण्यात येईल:-

(৭) नवीन नियुक्त शासकीय कर्मचा-यांची ज्येष्ठतायादी तयार करणे (टप्पा एक). -

(i) प्रतिवर्षी १ जानेवारी रोजीची, मागील कॅलेडर वर्षामध्ये (दि. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये) संबंधित संवर्गात थेट नियुक्ती किवा नियमित अथवा तात्पुरती पदोन्नतीने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरती ज्येष्ठतायादी तयार करुन ती प्रसिध्द करावी.

(ii) सदर तात्पुरती ज्येष्ठतायादी प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून १५ दिवसात संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्याबाबतच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील प्राप्त झालेल्या सूचना व हरकती विचारात घेऊन, त्यानंतर पुढील १५ दिवसात सदर तात्पुरती ज्येष्ठतायादी अंतिम करण्यात येईल.

मागील वर्षाची अंतिम ज्येष्ठतायादी अद्ययावत करणे (टप्पा दोन).

(1) मागील कॅलेंडर वर्षाच्या अंतिम ज्येष्ठतायादीमधील सेवानिवृत्ती, निधन, पदोन्नती, राजीनामा इ. कारणामुळे त्या संवर्गात कार्यरत नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची नावे वगळून ती सुधारीत करावी. [नियम ३(३) (क) नुसार तदर्थ पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव वगळण्यात येऊ नये.]

(ii) मागील कॅलेंडर वर्षाच्या अंतिम ज्येष्ठतायादीबाबत नियम ४ नुसार शासकीय कर्मचाऱ्यास मानीव दिनांक मंजूर केल्याबाबतचे शुध्दीपत्रक प्रसिध्द केले असल्यास, मागील वर्षीची अंतिम ज्येष्ठतायादी अद्ययावत करताना सदर शुध्दीपत्रक विचारात घेण्यात येईल आणि त्यानुसार संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास योग्य तो ज्येष्ठतेचा क्रमांक निर्धारीत करण्यात येईल.

(३) चालू वर्षीची अंतिम ज्येष्ठतायादी तयार करणे (टप्पा तीन). -

सदर नियमातील पोटनियम (२) नुसार मागील वर्षाची सुधारीत ज्येष्ठतायादी व सदर नियमातील पोटनियम (१) नुसार नवीन नियुक्त शासकीय कर्मचा-यांची तयार केलेली अतिम ज्येष्ठतायादी या दोन्ही एकत्रित करण्यात येईल आणि त्यानुसार चालू वर्षीच्या दि.१ जानेवारी रोजीची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्यात येईल. नियम ५ नुसार ज्येष्ठतायादी तयार करण्याची बाब अधिक स्पष्ट होण्याच्या अनुषंगाने सुलभ संदर्भासाठी सोबतच्या परिशिष्ट- चार मधील उदाहरण अवलोकन करावे.

सेवाविषयक इतर नियमातील तरतूदीच्या अनुषंगाने ज्येष्ठता सुधारीत करणे.-

शासकीय सेवेतील काही अनिवार्य अशा सेवाविषयक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने (उदा. विभागीय परीक्षा, परिविक्षाधीन कालावधी, विभागीय चौकशी इ.) संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवाज्येष्ठतेच्या स्थानातील बदलाबाबत कोणत्याही नियमांद्वारे विवक्षितरित्या तरतूद विहित करण्यात आली असेल तर, अशावेळी संबंधित नियमातील तरतूदीनुसार ज्येष्ठतेचा दिनांक व क्रमांक नव्याने सुधारीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल:

परंतु यापुढे कोणत्याही सेवाविषयक नियमात ज्येष्ठतेच्या अनुषंगाने विवक्षित तरतूद विहित करण्यापूर्वी त्यास सामान्य प्रशासन विभागाची सहमती घेण्यात येईल.

अर्थ विवरण करण्याचा अधिकार. या नियमातील तरतूदींचे अर्थविवरण करण्याचा अधिकार शासनाच्या सामान्य प्रशासन विभागास राहील.

नियम शिथील करण्याचा अधिकार. पूर्वगामी नियमात काहीही अंतर्भूत असले तरी, या नियमापैकी कोणत्याही नियमाची अंमलबजावणी केल्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास अथवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वर्गास गैरवाजवी तोशीस सोसावी लागत आहे किवा सोसावी लागण्याचा संभव आहे अथवा लोकहिताच्या दृष्टीने नियम शिथील करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत असेल तर त्याबाबतची कारणे लेखी नमूद करुन त्या कारणास्तव अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किंवा अशा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गाच्या बाबतीत आदेशाद्वारे असे निर्देशित करु शकेल की, अशा तरतुदी अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे, पण त्यांच्या आशयाला बाधा आणणार नाहीत अशा फेरबदलांसह अशा शासकीय कर्मचान्याला किंवा शासकीय कर्मचाऱ्याच्या वर्गाला लागू होतील: परंतु, अशा शासकीय कर्मचाऱ्यांचे किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्गाचे प्रकरण न्यायोचित रीतीने हाताळता यावे आणि या नियमांत तरतूद केलेल्या स्वरुपाचे लाभ प्रदान करता यावेत यासाठीच फक्त याप्रमाणे नियम शिथिल करता येतील किवा निदेश देता येईल.


महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने,


गीता कुलकर्णी,

शासनाचे उपसचिव.


संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.