दिवाळी सण अग्रीम बाबत महत्त्वाची सूचना
फेस्टिवल ऍडव्हान्स
शिक्षक संघटनच्या निवेदनाची दखल घेत शासना कडून शिक्षकांसाठी दिवाळी सण अग्रीम साठी निधी उपलब्ध झाला असून एक दोन दिवसात राज्यभर त्याचे वितरण करण्यात येणार. ऍडव्हान्स रक्कम मध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
दि. २ नोव्हेंबर रोजी मा. ना. दीपकजी केसरकर साहेब (मंत्री- शालेय शिक्षण) यांच्या कडे शिक्षक संघटना सोबत झालेल्या चर्चेच्या वेळी सण अग्रिम चा उपस्थित केला असता - मा. मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित आस्थापनेला दिले आणि तातडीने नस्ती ठेवण्याचे आदेशीत केले. तत्पश्चात ३ नोव्हेंबर रोजी सण अग्रिमसाठी ₹ २३७ कोटी तरतूदीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे.
दिवाळी सण अग्रीम बाबत तरतूद करिता वित्त विभाग मंत्रालय मुंबई येथे फाईल सादर केली असुन सोमवारी किंवा मंगळवारी शालेय शिक्षण विभागाला दिवाळी सण अग्रीम बाबत तरतूद वितरित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या पंचायत समिती नी सण अग्रीम ची मागणी सादर केली नसेल त्यांनी सोमवारी दु 2 वाजेपर्यंत शिक्षक संख्या कर्मचारी संख्या नुसार मागणी सादर करावी.
तरतूद उपलब्ध झाल्यास अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जे शिक्षक मार्च 24 मध्ये से नि आहे त्यांची सण अग्रीम मागणी करण्यात येऊ नये.
यावर्षी शासन स्तरावरुन दिवाळी सण निमित्त मिळणारे सण अग्रीम करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आले नाही.त्यामुळे यावर्षी सण अग्रीम मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
केवळ माहे ऑक्टोबर 23 च्या नियमित वेतनासाठी अनुदान प्राप्त झाले आहे.
माहितीस्तव
शालार्थ वेतन कक्ष
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद, यवतमाळ
प्रति,
गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व) पुणे जिल्हा परिषद पुणे
विषय- सण अग्रिम मागणीबाबत.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आपले तालुकाअंतर्गत कार्यरत ज्या शिक्षक कर्मचा-यांना सण अग्रिम घ्यावयाचा आहे अशा कर्मचा-यांची लेखी मागणी घेणेत यावी. सदर मागणीनुसार तालुकानिहाय यादी तयार करणेत येऊन कर्मचारी संख्या व मागणीपत्र तात्काळ शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करणेत यावे..
सदर बाबत कोणतीही दिरंगाई करणेत येऊ नये. मागणी प्रस्ताव प्राप्त न झाल्यास व शिक्षक कर्मचारी सण अग्रिमापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित कर्मचारी /अधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्राथ.) पुणे जिल्हा परिषद पुणे
सन अग्रीम अर्ज पीडीएफ डाउनलोड.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments