राज्यात १ मे २०२४ रोजी पासून जन्मलेल्या मुलांच्या नावमध्ये आता वडिलांच्या अगोदर आईचे नाव जोडले जाणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निर्णयाला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार यापुढे सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावाअगोदर आईचेही नाव लिहीणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासकीय अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला सर्व मंत्र्यांनी एकमताने मंजूरी दिली. त्यानुसार १ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात लिहावे लागणार आहे. तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, पगाराची स्लीप, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने तसेच शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव असे नोंदविण्याचे बंधनकारक असेल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments