शालेय क्रीडा स्पर्धेसाठी मैदानी खेळा अंतर्गत खोखो व लंगडीचे मैदान आखणी मापे नियम संपूर्ण माहिती

 खो - खो

1. सरपंचाने नाणेफेक करावी. नाणेफेक जिंकणारा संघ संरक्षण किंवा आक्रमण या पैकी एकाची निवड करेल.

2. खेळ सुरु करण्यापूर्वी संरक्षण करणाऱ्या संघाचे पहिले ३ खेळाडू मैदानात उतरतील. बाकीचे खेळाडू राखीव जागेत क्रमानुसार बसतील.

3. खेळ सुरु झाल्यावर पाटीवर बसलेल्या खेळाडूने खो मिळाल्या शिवाय उठावयाचे नाही, किंवा तोंड फिरवून बसवायचे नाही असे केल्यास तो नियमभंग आहे.

4. खो देणाऱ्या खेळाडूने मोठ्याने खो म्हणून बसलेल्या खेळाडूस हाताने स्पर्श केला पाहिजे आणि खो देणे व स्पर्श करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हाव्यात.

5. खो पध्दतीने खो दिल्यानंतर खो देणाऱ्याचा बसताना पाटीबाहेर तोल गेला तर फाऊल माणू नये.

6. पाठलाग करणाऱ्या खेळाडू डी एरियात कोणत्या बाजूस जाता येईल.

7. संरक्षण करणाऱ्या खेळाडूने चौरासावर बसलेल्या खेळाडूंना स्पर्श करावयाचा नाही. तसे आढळल्यास ताकीद द्यावी. ताकीद देऊनही त्याने पुन्हा स्पर्श केल्यास त्या खेळाडूस बाद करावे. 

8. आक्रमकाने संरक्षकास अडथळा न होईल असे बसले पाहिजे. अशा अडथळयाने संरक्षक बाद झाल्यास तो बाद मानला जात नाही. 

9. गतिमान आक्रमकाने कोणतेही नियमाचे उल्लंघन न करता संरक्षकास हाताने स्पर्श केल्यास किंवा संरक्षक मर्यादे रेषेबाहेर गेल्यास तो संरक्षक बाद दिला जाईल.

10. खेळाडू बदलण्यासाठी संघ नायकाने विनंती केल्यास परवानगी देतील.


सामान्य नियमावली

1. खो खो साठी १२ खेळाडू असतील. ९ खेळाडू प्रत्यक्ष खेळातील व ३ राखीव.

2. सामना हा २ डावात खेळवला जाईल.

3. सामन्यासाठी वेळ पळती व पाठलाग या पाळ्या प्रत्येकी ७ मिनिटाच्या राहतील.

4. २ पाळ्यांमध्ये २ मिनिटे व २ डावांमध्ये ५ मिनिटे विश्रांती कालावधी असेल.

5. गटातील ३ खेळाडू बाद होताच पुढील खो देण्यापूर्वी दुसऱ्या ३ खेळाडूंनी क्रीडांगणावर प्रवेश करावा. खो देण्यापूर्वी ज्यांनी क्रीडांगणावर प्रवेश ५ सेकेंदामध्ये केला पाहिजे, नाहीतर खेळाडू बाद ठरविला जाईल.

6. गटातील ३ रा खेळाडू बाद केल्यावर खो देण्यापूर्वी नवीन गटातील खेळाडूला स्पर्श करून बाद करता येणार नाही. 7. येणाऱ्या खेळाडूंनी खेळासाठी राखीव ठेवलेल्या जागी यातूनच क्रीडांगणावर प्रवेश करावा. सामन्यांमध्ये दोन्ही डावात मिळून दोन्ही संघाचे समान गुण झाल्यास प्रत्येक संघाला पळती व पाठलाग यांची एक एक पाळी द्यावी. यामध्ये सामन्याचा निकाल लागला नाही तर पुन्हा प्रत्येक संघाला एक एक पाळी द्यावी आणि ही पाळी सुरू असताना पळती येणाऱ्या संघाचा पहिला गडी बाद होताच पाळी थांबवावी व तो खेळाडू किती वेळात पास झाला याची नोंद घ्यावी. व दुसऱ्या संघास वेळ देऊन त्यांचा खेळाडू किती वेळात बाद झाला याची नोंद घ्यावी. ज्या संघाला प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू बाद करावयास कमी वेळ लागला असेल तोच संघ विजयी म्हणून घोषित करावा. 

8. अपुरा राहिलेला सामना दुस-या सत्रात खेळावा लागला तर पुन्हा पुर्ण सामना खेळवावा आणि त्यावेळी पंच सरपंच बदलू शकतो.

9. बाद झालेल्या खेळाडू क्रीडांगण बाहेरील लॉबीतून आपल्या बसण्याच्या जागेकडे जावे व बाधित झालेल्या क्रमाने बसावे.

10. खेळाडूच्या छातीवर व पाठीवर किटवर 10 सेमी उंची चा क्रमांक असावा

11. सरपंचाने सामन्याचा निकाल जाहीर केल्यावरच क्रीडांगण सोडावे

12. पंच वेळाधिकारी यांनी 11 मिनिटाने वेळ सांगावे शेवटच्या मिनिटांमध्ये सेकंदात वेळ सांगावे

13. संघाला टाईम आउट घेता येत नाही

14. तक्रार ही विश्रांती संघाच्या वेळेत घ्यावी ही तक्रार संघ नायकानेच करावी

15. संरक्षकाचे दोन्ही पाय मैदानाच्या बाहेर गेल्यास खेळाडू बाद

16. सामन्याची सुरुवात आक्रमणाने करणाऱ्या संघाचे गुण पहिल्या डावानंतर दुसन्या संघापेक्षा ६ अगर जादा गुणाने झाल्यास पूर्वीवत संघास आपल्या आक्रमणाचा हक्क न गमविता उपरोक्त संघास आक्रमण सांगण्याचा हक्क राहील.

17. मैदान पंचांनी क्रीडांगण बाहेरील लॉबीतून पंचगिरी करण्याची आहे.

18. संरक्षण म्हणजे खो-खोमध्ये पळण्याचे काम करणे.

19. आक्रमण म्हणजे खोखो मध्ये खेळाडूचा पाठलाग करणे. 

मैदान पंच.

1. सरपंच

2.गुणलखक

3. प्रत्यक्षात मैदानात दोन पंच.

4.वेळाधिकारी



लंगडी

> क्रीडांगण - मोठा गट/ लहान गट (9.15 मी.चा. चौरस)
> खेळाडू- दोन संघाचे प्रत्येकी 12 खेळाडू असतात. खेळणारे 9 व राखीव 3 खेळाडू असतात.
> पंच-3 पंच व 1 वेळाधिकारी
> वेळ-5-5 मिनिटाचे 4 डाव, 2 वेळा लंगडी, 2 वेळा पळती. एकूण 20 मिनिटाचा खेळ होतो.
> पहिली 10 मिनिटे झाली की 4 मिनिटे विश्रांती असते.

खेळाचे नियम

1. लंगडी घालणाऱ्याने पळणाऱ्यास बाद केल्यास लंगडी घालणाऱ्या संघास 1 गुण दयावा.
2. फक्त हातानेच स्पर्श करुन गडी बाद करावा.
3. लंगडी घालणाऱ्याचा हात अथवा वर धरलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद होतो. लंगडी घालणारा बाद झाल्यावर गुण मिळत नाही.
4. बाद झालेला लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्याशिवाय पुढच्या खेळाडूने प्रवेश करु नये. लंगडी घालणाऱ्या संघाचा लंगडी घालणारा पहिला खेळाडू बाहेर गेल्यावर दुसरा लंगडी घालणारा प्रवेश करतो.
5. लंगडी घालणाऱ्या खेळाडू साठीच्या बॉक्स मधून लंगडी घालणारा खेळाडू येईल.
6. पहिले 3 खेळाडू बाद झाल्यानंतर लंगडी घालणारा तोच असल्यास त्याने मध्यरेषा क्रॉस करणे आवश्यक आहे.
7. लंगडीला व पळतीला खेळायला आल्यावर ती पाळी संपल्यावर खेळाडू बदलू शकता.
8. लंगडी घालणारा 10 सेकंदाच्या आत यावा नाहीतर तांत्रिक गुण दुसऱ्या संघाला देवून लंगडी वाल्याला आत घ्यावे.
9. वेळ शिल्लक राहिल्यास लंगडीला पून्हा संधी नाही. लंगडीवाला बाहेर गेल्यास त्याने लंगडी घातली तरी चालेल. 
10. कोणत्या क्रमाने लंगडी घालणार व कोणत्या क्रमाने पळतीला जाणार हे प्रत्यक्ष संघाने गुणलेखकास प्रथम सांगावे.
11. पळतीचे सर्व गडी बाद झाले तरी वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने पळतीचे खेळाडू पळतील. सर्व 9 खेळाडू बाद झाले तरी लोन होत नाही.
12. पळणाऱ्यांनी 3 च्या गटाने उभे राहावे. तेथूनच एकेका वेळी 3 खेळाडूंनी प्रवेश करावा.
 13. पळणारा एक पाय आत असल्यास बाद नाही. एक पाय मैदानाबाहेर गेला तरी चालेल.
14. ज्या संघाने धावणाऱ्या संघाचे 20 मिनिटांच्या सामन्यात जास्तीत जास्त खेळाडू बाद केले तो संघ विजयी होतो. 15. समान गुण झाल्यास 5-5 मिनिटांचा जादा डाव खेळवावा. या सामन्यात ज्या संघाला जास्त गुण मिळतील तो संघ विजयी. तरी पण समान गुण झाल्यास, ज्या संघाने पकडण्यासाठी (लंगडी घालणारा) कमी खेळाडू वापरले तो संघ विजयी घोषित करावा. तरी पण समान गुण झाल्यास पुन्हा टॉस करुन, पहिला खेळाडू कितव्या मिनिटाला बाद केला गेला हे पाहून जो जास्त वेळाने बाद झाला तो संघ विजयी घोषीत करावा. त्यानंतरही बरोबरी झाल्यास संपूर्ण सामना परत खेळावावा.




 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.