राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शिक्षण संचालक यांचे निर्देश (NMMS Online Forms 2023-24 NSP Portal Start Last Date Notification GR)

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय माध्यम-सह-मेरीट शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) शेक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वर नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वरील बाबी लक्षात घेता, केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतनीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे उक्त प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.


तसेच उक्त कार्यवाही करतांना केंद्र शासन स्तरावरून दिलेल्या दुरध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येते की, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शिष्यवृत्तीस पात्र विद्याध्योनी अर्ज नुतणीकरण करतांना ज्या विद्याथ्यांचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP 2.0) वरील नाव व जन्मतारीखही आधार नुसार जुळत नसल्यास त्या विद्याथ्यांचे आधार व जन्मतारीख पडताळणी करून सोबत दिलेल्या विहित प्रपत्रात माहिती सादर करण्यात यावी, सदर माहिती केंद्र शासनास पाठविण्यात येत असल्याने विहित केलेल्या प्रपत्राच माहिती दिनांक १०.११.२०२३ पुर्वी संचालनालयास सादर करण्यात यावी. तसेच सोबत देण्यात आलेल्या गुगल लिंकवरही माहिती भरावी. विहित केलेल्या कालावधीनंतर माहिती संचालनालयास प्राप्त झाल्यास सदर माहितीचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdR9Ba8egECLTBLoEDoQ/viewform?usp=sflinkBVGidLo3CDs40


(डॉ महेश पालकर)

शिक्षण संचालक (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे-१


 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत शिक्षण संचालक योजना यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी ( NMMSS) शैक्षणिक प्रकल्प वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल उघडणेबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले आहे.


शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डी बी टी मिशन, कॅबिनेट सचिवालय यांनी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी सदर प्रकरणी चर्चा केली व उक्त कार्यवाही करण्याकरीता कालमर्यादा ठरवून दिलेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी एनएसपी पोर्टल साठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादा खालील प्रमाणे आहेत.


Opening of Portal

1st October, 2023

Last date for INO Level Verification


 31St November, 2023

15th December, 2023

Last date for Application submission

30th December, 2023

Last date for Second Level Verification

शैक्षणिक वरील बाबी लक्षात घेता, केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हयांनी नवीन व नुतणीकरण अर्जाच्या ऑनलाईन नोंदणीची कामे उक्त प्रमाणे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी..


शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी नोंदणी करतांना वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक असून त्याचे आधार असणेही अनिवार्य आहे. ज्या विद्याथ्र्यांनी अदयापही आधारकार्ड काढलेले नाही, त्या विद्याथ्र्यांनी आधारकार्ड साठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे तसेच त्यांनतर नावनोंदणी ( eKYC) वापरून पोर्टलला नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर आधार बाबत संपूर्ण तपशिल सबमिट होईपर्यंत आणि ई के वाय सी होईपर्यंत सदर विद्यार्थ्यांची नोंदणी तात्पुरती असेल. शिष्यवृत्ती पात्र / अपात्र या बाबीसाठी आधार महत्वाचे असेल.


अल्पवयीन अर्जदारांसाठी सर्व अर्जदार ज्यांनी नोंदणीच्या तारखेला १८ वर्षाचे वय पूर्ण केले नाही, त्यांना :


त्यांच्या पालकांच्या / कायदेशीर पालकांच्या संमतीने ऐच्छिक आधारावर आधार वापरून नोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल. जर अशा अर्जदारांना आधारकार्ड दिलेले नसेल तर ईआयडी वापरून नोंदणी करता येऊ शकेल, तथापि सदर प्रकरणी अल्पवयीन अर्जदारांना आधारकार्ड प्रदान केलेला नसेल, किमान एक पालक किंवा कायदेशीर पालकांचा आधारकार्ड चा वापर करता येईल. अशा प्रकरणी एक पालक किंवा कायदेशीर पालकांना लाभार्थी मानले जाईल, अल्पवयीन विद्याथ्यांनी आधारकार्ड शिवाय नोंदणी केल्यास, त्यांना ऐच्छिक आधारावर आधार जमा करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी नियमित एसएमएस पाठविले जातील.


ईआयडी च्या बाबतीत आधारकार्ड होईपर्यंत शिष्यवृत्तीचे वितरण होणार नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये आधार हस्तगत केला जात असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र काढून टाकण्यात आले आहे.


केंद्र शासनाच्या दि. २१/०३/२०२२ परिपत्रकामधील खालील सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.


१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक


आहे.


२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे... ३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र


आहेत.


४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.


५. इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या


विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी


प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे..


६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.


८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


९. विद्याथ्र्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल. १०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची


शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल. ११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षांचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसंच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत


नाही. १२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्याथ्र्यांचा दावा विचारात घेतला जाणार नाही.


ऑनलाईन माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. १२) एखाद्या विद्यार्थ्याने चूकीची माहिती भरली असल्यास त्यास Defect करावे Reject करु नये. जो विद्यार्थी


शिष्यवृत्तीसाठी पात्रच नाही तरी पण त्याने माहिती भरली असल्यास त्यास Reject करावे. २) Registration Details मध्ये Community / Categary या कॉलम मध्ये विद्यार्थी ज्या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. तो प्रवर्ग (SC/ST/OBC GENRAL) निवडावा. जे विद्यार्थी (SBC)/ VINTINT-1, NT-2, NT-3, NT-D) या प्रवर्गातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहे त्यांनी जनरल हा प्रवर्ग निवडून माहिती भरावी.


3) Academic Details Competitive Exam Qualified 4 NMMSS fasa. Exam Conducted by मध्ये महाराष्ट्र टाकावे. Competitive Exam Roll No. मध्ये सन २०२२ परीक्षा दि.१९/०६/२०२२ इ.९ वी 

करीता ME/U वगळून फक्त संख्यात्मक १२ अंकी परीक्षा क्रमांक टाकणे आवश्यक आहे.

४) Admission Fees, Tution Fees, Mise Fees यामध्ये ० टाकण्यात यावा. यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये


(५) Basic Details मधील Marital Status मध्ये Unmarried निवडावे Parents Profession मध्ये Other हा पर्याय निवडावा. *) Previous Board/University Name Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary, Pune निवडावे.


शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचा तपशील (IFSC CODE, BANK ACCOUNT NUMBER ETC) योग्य टाकण्यात यावा. सन २०२२ (Fresh) ची विद्याथ्यांची माहिती पोर्टल वर अपडेट झाली असून सदर पोर्टल हे ऑनलाईन व कालमर्यादित असल्यामुळे आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाच्या प्रत्येक शाळेने पात्र विद्यार्थ्यांची अचूक माहीती पोर्टलवर विहीत मुदतीत भरणे बंधनकारक आहे. सदर विद्यायांची माहिती भरण्यास विलंब व कोणतीही टाळाटाळ झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेची व आपल्या कार्यालयाची राहील. शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शाळांचे प्रोफाईल अदयावत करणे / तपासण्याची कार्यवाही करावी...


करीता केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त वेळापत्रक आपल्या जिल्हयातील सर्व शाळा व INO / Hol यांना पाठविण्यात यावी. शिष्यवृत्तीधारक कोणताही विद्यार्थी हा ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, याची नोंद घ्यावी.


(महेश पालकर) शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.